‘द केरळ स्टोरी’ धर्मांतरासाठी मुसलमानांची टूलकिट

397
'द केरळ स्टोरी' धर्मांतरासाठी मुसलमानांची टूलकिट
'द केरळ स्टोरी' धर्मांतरासाठी मुसलमानांची टूलकिट

नुकताच ‘द केरळ स्टेारी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाबाबत सध्या बरीच उलटसुलट चर्चा, वादविवाद देशभर रंगलेले दिसतात. ही कथा एकट्या केरळची नाही, तर ती आज देशातील कानाकोपऱ्यातील वस्त्यांची आहे, तसेच अमेरिका, फ्रांस सारख्या विकसित देशांचीही आहे. जेथून महिलांचे ब्रेनवॉश करून त्यांना इराक आणि सीरिया येथे इस्लामिक स्टेट निर्माण करण्यासाठी त्यांना जिहादी बनवून पाठवण्यात आले. ज्याची एक मोडस ऑपरेंडी ठरवण्यात आली. त्याची एक विशिष्ट कार्यपद्धती निर्माण करण्यात आली होती. जिला आताच्या भाषेत सांगायचे तर ती ‘टूलकिट’ होती.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटात टूलकिट दाखवण्यात आली आहे. यासाठी एक सामान धागा ठेवण्यात आला, ज्याच्या आधारे या चित्रपटातील आसिफा तिचे रूममेट शालिनी, गीतांजली आणि निमा या तिघींचे ब्रेनवॉश करते. ‘इस दुनिया को सिर्फ अल्ला चलाता हैं, ओनली अल्ला….’ आसिफाच्या या वाक्याने तिच्या टूलकिटची सुरुवात होते. ज्या तीन जणींच्या तोंडावर आसिफा बिनधास्त हे वाक्य मारते त्यातील शालिनी एक सामान्य घरची हिंदू मुलगी आहे, गीतांजलीचे वडील कम्युनिस्ट विचारसरणीचे. ती देवधर्म वगैरे काहीही मानत नसते. मात्र, जन्माने हिंदूच आहे, तर निमा ही धार्मिक ख्रिश्चन. पुढे असिफा तिच्या हिंदू आणि ख्रिस्ती रूममेट्सना विचारते, ‘तुमचा देव कोणता?’ यावर अतिशय निरागस शालिनी म्हणते, ‘आय थिंक शिवा इज बिग!’ यावर आसिफा म्हणते, ‘कौनसे गॉड को मानते हो, वो गॉड जो अपने वाईफ के मरने पर कॉमन मॅन की तरह रोता हो, वो गॉड कैसे हो सकत हैं?’ पुढे असिफाच्या या विधानावर शालिनी गप्प होते. तिच्याकडे या प्रश्नाचे किंबहुना तिच्या देवतांचे तिच्यासमोर विटंबना करणाऱ्या वाक्याचा प्रतिवाद करण्यासाठी उत्तर नसते. कारण, तिला या संदर्भातल्या धार्मिक संकल्पना आणि घटना याबद्दल काहीएक माहिती नसते. शेवटी आसिफा जिंकते आणि एकतर्फी चर्चा सुरु होते, आता फक्त आसिफा बोलू लागते, हिंदू देवीदेवता कशा शक्तिहीन आहेत. हे म्हणणे शब्दांतून सिद्ध करण्यात आसिफा यशस्वी होते. इतकेच नाही तर त्या तिघींपैकी निमा या ख्रिस्ती मुलीलाही तुझा देव ज्याला सुळावर चढवून खिळे ठोकून ठार मारण्यात आले, त्यावेळी त्याने स्वतःचे रक्षण केले नाही, तो तुझे काय रक्षण करणार? आणि निमाही अस्वस्थ होते परंतु विरोध मात्र करत नाही. चित्रपटातले हे दृश्य पाहताना शालिनीसारख्या कितीतरी निरागस किशोरवयीन मुली आठवल्या, ज्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकल्या आणि आयुष्य नरकवासात घालवून बसल्या. यांच्या आयुष्यातही आसिफा नावाची कुणी ना कुणी व्यक्ती कधी ना कधी अस्तित्वात होतीच.

(हेही वाचा – The kerala Story : विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्याला केरळ उच्च न्यायालयाने फटकारले; म्हणाले… )

कोणत्याही थराला जाऊन केले जाते धर्मांतर

शालिनी, गीतांजली आणि निमा या तिन्ही मुलींचे धर्मपरिवर्तन करून त्यांना सीरियाला पाठवण्यासाठी अासिफा काही मुस्लीम पुरूषांची मदत घेते. त्यांना आदेश देणारा धर्मांध मुसलमान म्हणतो, ‘तुमच्याकडून त्या मुली कशा फसवल्या जात नाहीत? उन्हे करिब लाओ, खानदान से जुदा करावो, जिस्मानी रिश्ते बनाओ. जरूरत पडे तो उन्हे प्रेग्नंट करो!’ इतकेच काय तर दहशतवादी संघटनांकडून सूचित केल्याप्रमाणे अमली पदार्थांचा वापर करण्याचाही आग्रह करतो. त्या टूलकिटचा पुढचा भाग सुरु होतो. हे सगळे पाहताना दुर्दैवी श्रद्धा वालकर आठवते. वसईच्या मराठमोळ्या श्रद्धाला म्हणे अमली पदार्थांचे व्यसन होते. आईबाबांना न जुमानता ती त्या आफताबबरोबर दिल्लीला ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहायला गेली होती. अशाच संबंधातून मुलींना ‘ब्लॅकमेल’ करण्याच्याही घटना सर्रास घडल्या आहेत. या चित्रपटात या तिन्ही मुलींना बुरखा घालण्यास भाग पाडण्यासाठी एक खोटे नाट्य आसिफा रचते. या तिघी मॉलमध्ये जातात तेव्हा आसिफा काही मुसलमान तरुणांना मॉलमध्ये पाठवून ते तरुण तिथे या तिन्ही मुलींचा विनयभंग करून त्यांचे कपडे फाडतात. त्यावेळी आसिफा त्यांना सांगते की, ‘तिथे इतक्या मुली होत्या, पण तुमच्यासोबतच असे का झाले? कारण, तुम्ही हिजाब घातला नव्हता. हिजाब पेहने लडकी पर ना ही कभी रेप होता हैं, ना ही उन्हे कोई छेडता हैं, बिकॉज अल्ला ऑलवेज प्रोटेक्ट हर!’ आणि पुढे या तिन्ही मुली मनाने इतक्या खचलेल्या असतात आणि भविष्यात कुणी आपली छेड काढू नये म्हणून त्या चक्क हिजाब घालू लागतात. पुढे आसिफा रमिझशी शालिनीचे आणि गीतांजलीचे अब्दुलशी प्रेम जुळवून देते. हे दोघेही जण या मुलींशी शारीरिक संबंध निर्माण करतात. यामध्ये शालिनी नंतर गरोदर राहते. मात्र, रमिझ सांगतो की, ‘माझ्या घरी हिंदू मुलगी सून म्हणून चालणार नाही.’ शालिनी रमिझच्या प्रेमात अक्षरश: वेडी झालेली असते. शालिनी धर्मांतर करते. मात्र, काही कारणास्तव रमिझ अम्मीसोबत मालदीवला जातो, असे सांगत तो तिथून कुठेतरी कायमचा पसार होतो. गरोदर शालिनी मग अधिकच हतबल होते. त्यावेळी चित्रपटातला धर्मांध मौलवी तिला सांगतो की, ‘तू काफीर आहेस. हा तुझा पहिला गुन्हा. तू अमली पदार्थांचे व्यसन करते, हा तुझा दुसरा गुन्हा आणि लग्नापूर्वी तू शरीरसंबंध ठेवलेस, हा तिसरा गुन्हा आणि सगळ्यात महत्त्वाचे, निकाहाआधी तू गरोदर राहिलीस, हा तर सर्वांत मोठा गुन्हा. यातून तुला बाहेर पडायचे असेल तर तू दुसरा निकाह कर आणि ती मान्य करते. तिच्यासमोर तिचा दुसरा नवरा सीरिया देशाचे चित्र रंगवतो. तिथे कसे सगळे चांगले-सुखनैव आहे, आपण तिकडे गेल्यावर कसे चांगले होईल वगैरे वगैरे. शालिनीही मग त्याच्यासोबत सीरियाला जायला तयार होते. इकडे गीतांजली मुस्लीम धर्म स्वीकारण्याच्या वाटेवर असते आणि ती मुस्लीम धर्मांतरित होणार, म्हणून तिचे वडील चिंतेने आजारी पडतात. त्यावेळी तिची आई गीतांजलीला म्हणते, ‘तू एकदा घरी ये, बाबाला भेट. आमची सगळी संपत्ती तुझीच आहे.’ पण, आसिफा तिला सांगते, ‘काफीरवर थुंकले किंवा त्याच्यावर दगड मारणे, हे चांगले आहे. काफिराची संपत्ती कोणत्या रूपात आपण काबिज केली पाहिजे. तू जा आणि तुझ्या आईकडून पैसे घेऊन ये.’ यावेळी गीतांजली हॉस्पिटलमध्ये जाते. आजारी बापाजवळ जाते आणि अतिशय द्वेषाने त्यांच्या तोंडावर चक्क थुंकते. त्यानंतर ‘तुझी सगळी संपत्ती घेऊन आपण सीरियाला जाऊ, असे अब्दुल गीताजंलीला सांगतो. पण, तिला केरळ सोडायचे नसते. ती अब्दुलला नकार देते. यावर अब्दुल तिला धमकावतो. ती म्हणते, ‘मी माझ्या आईबापाचे एकत नाही, तर मग तू कोण?’ धमकी देऊनही ती सीरियाला जायला तयार होत नाही. नंतर गीतांजलीला सगळे समजते, ती घरी येते तिच्या कम्युनिस्ट वडिलांना सांगते की, ‘ते खूप भयंकर आणि दुष्ट लोकं आहेत.’ ती म्हणते, ‘मला आसिफाचे सगळे खरे वाटले. कारण, मला आपला धर्म सांगितलाच गेला नाही. तुम्ही कम्युनिस्ट विचारसरणी सांगितली, पण आपला देवधर्म सांगितला नाही.’ त्याचवेळी अब्दुल तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतो.

या सगळ्यामुळे नैराश्यात जात गीतांजली आत्महत्या करते, तर निमा कधीच आसिफाच्या जाळ्यात फसत नाही. मात्र, शालिनी तिला गळ घालते. ती म्हणते, ‘एकदा तू त्या मुलाला भेट.’ मग ती आसिफासोबतच्या त्या मुलाला भेटायला जाते. तो ती पित असलेल्या पेयात अमली पदार्थ मिसळतो. निमा बेशुद्ध पडते. तिचे अपहरण करून तिच्यावर सातत्याने बलात्कार केला जातो. निमा शुद्धीत येते, तेव्हा १८ ते १९ जणांनी तिच्यावर बलात्कार केलेला असतो. ती मनापासून हादरते. तिथून कसाबसा धीर एकवटत ती पळून येते. अशातच शालिनीला निमाचा फोन येतो की, गीतांजलीने आत्महत्या केल्याचे आणि तिच्यावरही बलात्कार झाल्याची आपबिती ती शालिनीला सांगते. पद्धतशीरपणे ‘ब्रेनवॉश’ झालेली शालिनी उर्फ फातिमा तिच्या दहशतवादी नवऱ्याला म्हणते ‘गीतांजलीने मुस्लीम धर्म सोडला म्हणून तिला मरायची बुद्धी झाली आणि निमा तर इस्लाम मानतच नव्हती, म्हणून तिच्यावर बलात्कार झाले. पण, मी इस्लाम धर्म स्वीकारला आहे, मी अल्लाला मानते, असे म्हणून ती निश्चिंत होते. पुढे तिचा दहशतवादी नवरा सीरियाला जातो. पुढे शालिनीला सगळे खरे समजते पण वेळ निघून गेलेली असते तिथे सर्व अमानवीय अत्याचार सहन करते, या संपूर्ण टूलकिटचा हा शेवट असतो. सीरियातून शालिनी जिवाच्या आकांताने सीरियाची सीमा ओलांडते आणि जीव वाचवते. संयुक्त राष्ट्र संघाच्या पोलिसांच्या ताब्यात येते, ज्यांच्या चौकशीत शालिनी तिची आणि तिच्या अन्य दोन मैत्रिणींची सविस्तर कथा सांगते. अर्थात ही टूलकिट सांगते. संयुक्त राष्ट्र संघाच्या ज्या कोठडीत शालिनीला ठेवले आहे, तिच्यासोबत अमेरिका, फ्रांस सारख्या विकसित देशांतीलही पीडित महिला दिसल्या. त्यामुळे ही टूलकिट केवळ भारतातच नाही तर जगभरात वापरण्यात आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.