Indian film director: सामाजिक समस्या दर्शवणारे चित्रपट दिग्दर्शक कोण?

के. राघवेंद्र राव यांना बोब्बीली ब्राह्मण्णा आणि पेल्ली सनदी या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन करण्याकरिता राज्य नांदी पुरस्कार देण्यात आला होता.

88
Indian film director: सामाजिक समस्या दर्शवणारे चित्रपट दिग्दर्शक कोण?

के. राघवेंद्र राव यांचा जन्म २३ मे १९४२ साली झाला. त्यांचे वडील के. एस. प्रकाश राव हे प्रसिद्ध दिग्दर्शक होते. त्यांच्या आईचं नाव कोटेश्वरम्मा असं होतं. के. राघवेंद्र राव हे अभिनेते आणि निर्माते प्रकाश कोवेलामुडी यांचे वडील आहेत. (Indian film director)

कोवेलामुडी राघवेंद्र राव हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते आहेत. त्यांनी काही हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शनसुद्धा केलं आहे. त्यासोबतच त्यांनी तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे. के. राघवेंद्र राव यांची कारकीर्द चार दशकांहून अधिक काळाची आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 4 राज्य नांदी पुरस्कार आणि 5 दक्षिणेकडील फिल्मफेअर पुरस्कार मिळवले आहेत. (Indian film director)

(हेही वाचा – Lok Sabha Elections : या आमदारांचे विधानसभा तिकीट धोक्यात? भाजपा-सेना घेणार आमदारांची शाळा?)

आपल्या चित्रपट कारकिर्दीमध्ये राघवेंद्र राव यांनी रोमँटिक, कॉमेडी, फँटसी, मेलोड्रामा, ॲक्शन थ्रिलर, बायोग्राफीकल चित्रपट यांसारख्या अनेक शैलींमध्ये शंभरपेक्षा जास्त वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.

के. राघवेंद्र राव यांना बोब्बीली ब्राह्मण्णा आणि पेल्ली सनदी या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन करण्याकरिता राज्य नांदी पुरस्कार देण्यात आला होता. तसेच प्रेमा लेखलु, जगदेका विरुड्डू आथिलोका सुंदरी आणि अल्लारी प्रियुडू या चित्रपटांसाठी के. राघवेंद्र राव यांना तेलगू सिनेमांचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून फिल्मफेअर अॅवॉर्ड देण्यात आला होता.

त्यांच्या अन्नमय्या या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. के राघवेंद्र राव यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये सामाजिक समस्या दर्शवणारे तसेच तत्कालीन परिस्थितीवर आधारित असलेले अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यासाठी त्यांच्या कामाचं दरवेळेस कौतुक करण्यात आलं होतं. त्याव्यतिरिक्त ते २०१५ ते २०१९ सालादरम्यान ते तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाचे कार्यकारी सदस्य होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.