Lok Sabha Elections : या आमदारांचे विधानसभा तिकीट धोक्यात? भाजपा-सेना घेणार आमदारांची शाळा?

महायुतीतील भाजपा आणि शिवसेना (शिंदे) नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या आमदारांना त्यांच्या मतदार संघातून कमी मतदान झाल्यास विधानसभा तिकीट कापले जाईल, असा सज्जड दम दिला होता.

171
Lok Sabha Elections : या आमदारांचे विधानसभा तिकीट धोक्यात? भाजपा-सेना घेणार आमदारांची शाळा?
  • सुजित महामुलकर

मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) भाजपाच्या सहा आणि शिवसेनेच्या (शिंदे) दोन विधानसभा मतदार संघांमध्ये कमी मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाच्या अंदाजित आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या आमदारांची भाजपा-सेनेकडून शाळा घेण्यात येईलच पण आगामी विधानसभा निवडणुकीचे तिकीट धोक्यात येण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Elections)

आमदारांचे धाबे दणाणले

महायुतीतील भाजपा आणि शिवसेना (शिंदे) नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या आमदारांना त्यांच्या मतदार संघातून कमी मतदान झाल्यास विधानसभा तिकीट कापले जाईल, असा सज्जड दम दिला होता. त्यामुळे सगळ्याच आमदारांचे धाबे दणाणले होते. अनेकांनी तिकिटावर परिणाम होऊ शकतो या भीतीने महायुतीच्या उमेदवारसाठी काम केले. काही ठिकाणी जसे मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, ईशान्य मुंबई, भिवंडी, पालघर या मतदार संघांमध्ये भाजपाचा उमेदवार आणि शिवसेनेचे काही आमदार तर कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपाचे काही स्थानिक आमदार अशी परिस्थिति होती. मनसे आमदार प्रमोद पाटील यांच्या मतदार संघातदेखील ५२ टक्क्यांपेक्षा कमी मतदानाची नोंद झाली. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – MNS : लोकसभा निवडणुकीत मनसैनिक चार्ज, सराव सामन्याद्वारे विधानसभेसाठी सज्ज)

कुलाब्यात सगळ्यात कमी मतदान

निवडणूक आयोगाच्या २२ मे च्या अंदाजित आकडेवारीनुसार, भाजपाचे आमदार तमिळ सेल्वन यांच्या सायन-कोळीवडा मतदार संघात ५१.६३ टक्के, कुमार ऐलाणी यांच्या उल्हासनगरमध्ये ५१.१० टक्के, गणेश नाईक यांच्या ऐरोली मतदार संघात ४८.४७ टक्के, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीमध्ये ५१.६७ टक्के भाजपा समर्थक गीता जैन यांच्या मीरा-भाईंदर मतदार संघात ४८.९५ टक्के आणि दक्षिण मुंबईचे टोक असलेल्या कुलाबा मतदार संघात सगळ्यात कमी केवळ ४३.६८ टक्के मतदान झाले आणि या मतदार संघाचे प्रतिनिधित्व खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करत आहेत. (Lok Sabha Elections)

पाचव्या टप्प्यात पालघर सरस

शिवसेनेचे चांदिवली मतदार संघाचे आमदार दिलीप लांडे यांच्या मतदार संघात ४९.४३ टक्के तर अंबरनाथचे शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांच्या मतदार संघात ४७.०७ टक्के मतदान झाले. तर मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांच्या कल्याण-ग्रामीण मतदार संघात ५१.०१ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. पाचव्या टप्प्यात झालेल्या मतदानात मुंबई महानगर प्रदेश परिसरात (MMR), सगळ्यात कमी मतदान ५०.०६ टक्के दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात झाले असून त्या खालोखाल कल्याण लोकसभा मतदार संघात ५०.१२ टक्के मंतदानाची नोंद आहे. तर सर्वाधिक मतदान पालघर लोकसभा मतदार संघात ६३.९१ टक्के नोंदवले गेले. (Lok Sabha Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.