Smuggling : इराण-पाकिस्तानातील दहशवाद्यांसाठी पश्‍चिम भारतीय समुद्रतट बनला तस्करीचा मार्ग

अरबी समुद्रात अशा प्रत्येक नौकेला थांबवून शोध घेणे अशक्य आहे. भारताचा पश्‍चिम किनारा हा उत्तरेला सुरत (गुजरात) येथपासून दक्षिणेला कन्याकुमारी (तामिळनाडू) येथपर्यंत म्हणजे अनुमाने १ हजार ५०० किमी पसरलेला आहे.

111

पाकिस्तान आणि इराण येथील दहशवादी शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ यांची तस्करी (Smuggling) करण्यासाठी भारताची पश्‍चिम किनारपट्टी आणि सागरी क्षेत्र यांचा वापर करत आहेत. या मार्गावरून तस्करी करणार्‍या नौकांचा मुख्य सूत्रधार ओळखणे, हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. या नौकांमधून अटक करण्यात आलेल्या लोकांना नौकांतील माल कुणाचा आहे किंवा त्यांना पैसे देणारे लोक कोण आहेत, याची माहिती नसते. अशा परिस्थितीत अटक आणि चौकशी यातून फारसा काही सुगावाही लागत नाही.

अशी होते तस्करी 

भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अरबी समुद्रात गुजरातच्या किनार्‍याजवळ एक नौका पकडली आणि पाच पाकिस्तानी संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून तीन हजार किलोहून अधिक अमली पदार्थ जप्त केले. अरबी समुद्रात अशा प्रत्येक नौकेला थांबवून शोध घेणे अशक्य आहे. भारताचा पश्‍चिम किनारा हा उत्तरेला सुरत (गुजरात) येथपासून दक्षिणेला कन्याकुमारी (तामिळनाडू) येथपर्यंत म्हणजे अनुमाने १ हजार ५०० किमी पसरलेला आहे. तस्कर पाकिस्तानी आणि इराणच्या किनारपट्टीवरून भारतात माल पोचवण्याचे काम करतात. तस्करीसाठी (Smuggling) वापरल्या जाणार्‍या नौका साधारणतः ५०-७० फूट लांब, १५-२० फूट रुंद आणि १०-१२ फूट उंच असतात. त्यांचे वजन १ हजार ५०० टन असते आणि त्यावर १५-२० माणसे असू शकतात. हे दहशतवादी इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथून शस्त्रे आणि अमली पदार्थ खरेदी करतात आणि अरबी समुद्र आणि हिंदी महासागराच्या बाजूच्या देशांना पुरवतात.

(हेही वाचा Narendra Modi: देशातील पाण्याखालून धावणाऱ्या पहिल्या मेट्रोचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, कसे आहे मेट्रो स्टेशन ? जाणून घ्या…)

याआधीही होत होती तस्करी 

‘संडे गार्डियन’च्या अहवालात असे म्हटले आहे की, वर्ष १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटात वापरलेला दारूगोळा आणि ३ हजार किलो ‘आर्.डी.एक्स.’ स्फोटके पाकिस्तानातून महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी आणि दिघी या घाटांतून मुंबईत आणण्यात आली होती. इराणमधील चाबहार बंदर परिसरात अनेक सशस्त्र गट कार्यरत आहेत, जे  पाकिस्तानच्या संगनमताने बेकायदेशीर कारवाया करतात. असाच एक गट जैशुल-अदल याने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचे अपहरण केल्याचा संशय आहे. जाधव यांना मार्च २०१६ मध्ये चाबहार येथून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या ताब्यात देण्यात आले होते. यावर्षी ११ जानेवारी या दिवशी अमेरिकी नौदलाने अरबी समुद्रात सोमालियाच्या किनार्‍याजवळ एक छोटी नौका अडवली. या बोटीत अमेरिकी सैनिकांना इराणमध्ये बनवलेली शस्त्रे सापडली. या कारवाईत बोटीतून १४ जणांना अटक करण्यात आली. या सर्वांकडे पाकिस्तानी ओळखपत्र होते. (Smuggling)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.