Terrorist killed: लष्कर ए तोयबाचा दहशतवादी हबीबुल्लाह ठार

ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये बिलाल मुर्शीद, अकरम गाझी, अबु कासिम यासारख्या क्रूरकर्म्यांचा समावेश आहे.

183
Terrorist killed: लष्कर ए तोयबाचा दहशतवादी हबीबुल्लाह ठार
Terrorist killed: लष्कर ए तोयबाचा दहशतवादी हबीबुल्लाह ठार

लष्कर ए तोयबाचा दहशतवादी हबीबुल्लाह (Terrorist killed) अज्ञातांनी  केलेल्या गोळीबारात ठार झाला आहे. काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा सहभाग होता.

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येत आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये बिलाल मुर्शीद, अकरम गाझी, अबु कासिम यासारख्या क्रूरकर्म्यांचा समावेश आहे. याच दरम्यान पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा प्रांतातून हबीबुल्लाहच्या हत्येची बातमी उघड झाली आहे.

(हेही वाचा – Parliament Security: संसदेत घुसखोरी करणाऱ्या सागर शर्माचा कुटुंबियाशी संवाद, व्हिडियो कॉलवर काय बोलला? वाचा सविस्तर… )

हबीबुल्लाह हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याचा निकटवर्तीय होता तसेच २०१६ मध्ये झालेल्या उरी येथील हल्ल्यातही त्याचा प्रामुख्याने सहभाग होता. त्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता. रविवारी सायंकाळी हबीबुल्लाहवर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बेछूट गोळीबार केल्यामुळे हबीबुल्लाह जागीच ठार झाला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.