Kargil Vijay Divas 2023 : कॅप्टन विक्रम बत्रा कारगिल युद्धाचे वीर

113

राजकीय तणाव आणि धार्मिक वादविवादांमध्ये, आपल्याला कारगिल युद्धातील, “कॅप्टन विक्रम बत्रा” यांचा विसर पडला आहे. २४ वर्षांपूर्वी २६ जुलै रोजी कॅप्टन विक्रम बत्रा हे पाकिस्तानच्या ताब्यातून कारगिलचे शिखर पॉइंट ४८७५ परत मिळवताना शहीद झाले होते. त्यांची शौर्यगाथा २४ वर्षांनंतर देखील लोकांना आव्हानांवर मात करण्यासाठी प्रेरणा देते.

१९९९च्या कारगिल युद्धादरम्यान, पाकिस्तानी सैन्याने कारगिलमध्ये घुसखोरी करुन टेकड्या ताब्यात घेतल्या. त्याच वेळी हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे होळी साजरी केली जात होती. होळी साजरी करताना विक्रम बत्रा यांना पाकिस्तानी सैन्याने टेकड्यांवर घुसखोरी केल्या.

(हेही वाचा Anju : मित्राला भेटायला पाकिस्तानात गेली आणि नसरुल्लाहची ‘बिवी’ बनली; अंजुचा प्रताप )

विक्रम बत्रा यांच्या नेतृत्वाखाली पॉइंट ५१४० ची लढाई जिंकली गेली आणि पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलेल्या टेकड्यांवर भारतीय तिरंगा उंचावला गेला. कारगिल युद्धानंतर शिखराचे नाव ‘टायगर पॉइंट’ असे करण्यात आले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारातही कॅप्टन विक्रम बत्रा आणि त्यांच्या सहकारी सैनिकांनी विलक्षण शौर्य दाखवून शत्रूचे बंकर आणि चौक्या उद्ध्वस्त केले. दुर्दैवाने, त्यांनी २६ जुलै १९९९ रोजी बलिदान दिले, मात्र त्याआधी पाच पाकिस्तानी सैनिकांना त्यांनी ठार केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.