Israel Iran War : मध्यपूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता निर्माण झाली आहे. सध्या तरी हा संघर्ष लवकर कमी होण्याची शक्यता दिसत नाही. (Israel Iran War)
इराणने (Iran) दावा केला आहे की तो अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध किमान सहा महिने तीव्र संघर्ष सुरू ठेवू शकतो. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने रविवारी एका न्यूज एजन्सीला दिलेल्या निवेदनात हा दावा केला. गार्ड्सचे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी (Ali Mohammad Naini) यांनी सांगितले की, “इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सशस्त्र दलांकडे सध्याच्या मोहिमेच्या गतीने किमान सहा महिने संघर्ष सुरू ठेवण्याची पूर्ण क्षमता आहे.” (Israel Iran War)
(हेही वाचा – केंद्रीय मंत्री Amit Shah यांचा ‘मास्टर प्लॅन’ तयार! घुसखोरांची खैर नाही; देशभर राबवणार ‘क्लीन इंडिया’ मोहीम?)
आयआरजीसीच्या दाव्यानुसार, त्यांनी संपूर्ण मध्यपूर्वेत अमेरिकन आणि इस्रायली तळ तसेच त्यांच्याशी संबंधित २०० पेक्षा अधिक ठिकाणांना लक्ष्य केले आहे.
दरम्यान, इस्रायलनेही इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले केले आहेत. शनिवारी तेहरान आणि शेजारील करज शहरात जोरदार स्फोट झाले. इस्रायली सैन्याने अनेक इंधन साठवण संकुलांवर हल्ले केल्याने आकाशात आग आणि धुराचे मोठे ढग दिसून आले. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये हल्लाग्रस्त भागांमध्ये मोठ्या आगीच्या ज्वाळा उसळताना दिसत आहेत. (Israel Iran War)
अमेरिका आणि इस्रायलने तेहरान आणि अल्बोर्ज प्रांतांतील अनेक तेल साठवण डेपोना लक्ष्य केल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी इराणविरुद्ध पुढे आणखी अनेक “सरप्राइज” कारवाया होण्याचा इशारा दिला आहे. (Israel Iran War)
या घडामोडींमुळे मध्यपूर्वेत तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

