Israel-Hamas Conflict: लेबनॉनवर इस्रायलचा हल्ला, हिजबुल्लाचा कमांडर ठार

159
Israel-Hamas Conflict: लेबनॉनवर इस्रायलचा हल्ला, हिजबुल्लाचा कमांडर ठार
Israel-Hamas Conflict: लेबनॉनवर इस्रायलचा हल्ला, हिजबुल्लाचा कमांडर ठार

इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यात हिजबुल्ला गटाचा प्रमुख कमांडर विसम हसन तावि याला ठार मारले. गाझामधील लढाईत एन्क्लेव्हच्या नागरिकांची संख्या वाढत असताना लेबनॉनच्या सीमेवरील हल्ल्यांच्या वाढत्या देवाणघेवाणीदरम्यान इस्रायलकडून हा हल्ला करण्यात आला. (Israel-Hamas Conflict)

दक्षिण इस्रायलवर हमासने ७ ऑक्टोबरला हल्ला केला. त्यानंतर इस्रायल गाझासह लेबनॉनवर सातत्याने हल्ले करत आहे. विसम हसन ताविल हा हिजबुल्लाचा कमांडर असून तो सशस्र गटातील सर्वात वरिष्ठ दहशतवादी होता. गेल्या आठवड्यात बैरूतमध्ये हमासचा एक वरिष्ठ नेता ठार झाल्यापासून लेबनॉनवरील हल्ले प्रतिहल्ल्यांमध्ये वाढ झाली होती, अशी माहिती हिजबुल्लाकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Uran Godown Fire : उरणमधील गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना)

इस्रायल सैन्याने याबाबत दिलेली माहिती अशी की,  ही लढाई आणखी अनेक महिने सुरू राहील कारण तेल अवीव हमासला उद्ध्वस्त करण्याचा आणि ७ ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यादरम्यान ओलीस ठेवलेल्या व्यक्तिंना परत आणण्याचा प्रयत्न करत आहे तसेच सध्या उत्तर गाझामधील युद्ध मोहीम थांबवण्यात आली असून मध्य आणि दक्षिणेकडील खान युनिस शहरांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.