Uran Godown Fire : उरणमधील गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना

आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

119
Uran Godown Fire : उरणमधील गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना
Uran Godown Fire : उरणमधील गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात कंठवली गावातील चिरनेर परिसरात सोमवारी, (8 जानेवारी) एका गोदामाला दुपारच्या सुमारास भीषण आग (Uran Fire) लागली. ही आग इतकी भीषण होती की, दूरवरून आग आणि धुराचे लोट आकाशात दिसत होते. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एएनआय या वृत्तसंस्थेने आगीच्या या घटनेचा व्हिडियो शेअर केला आहे.

आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानंतर काही वेळेतच ओएनजीसी, जेएनपीटी आणि उरण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आगीची घटना बघण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.


सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहेत. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.