Iran-Israel War : इराण-इस्त्रायल युध्द(Iran-Israel War) दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत असतानाच इस्त्रायली सैन्याने मोठा दावा केला आहे. इराण-इस्त्रायल युध्दा(Iran-Israel War)त इस्त्रायल सैन्याने मोठा दावा केला असून नतान्झ व अरकमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केले आहे. इस्त्रायली सैन्याच्या दाव्याने इराणमधील अणुक्रेंदांबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, इस्त्रायली सैन्याच्या दाव्याने मोठी खळबळ माजल्याचे पाहायला मिळत आहे.(Iran-Israel War)
(हेही वाचा Air India Plane Crash : एअर इंडिया मोठ्या विमानांचा वापर १५ टक्क्यांनी कमी करणार )
दरम्यान, रात्री झालेल्या हवाई हल्ल्यात इस्त्रायली सैन्याकडून इराणमधील नतान्झ व अरकमधील अणुऊर्जा केंद्राला लक्ष्य करण्यात आले. इराणमधील अरक परिसरातील अणुभट्टीला रात्री लक्ष्य केले तर नतान्झ परिसरातील अणुबॉम्ब विकास केंद्रावर हल्ला केल्याचे इस्त्रालयी सैन्याने म्हटले आहे. इराणच्या अरक परिसरातील अणुऊर्जा केंद्राला लक्ष्य करतानाच आता खोंदाब नावाचा एक अंशतः बांधलेला जड पाण्याचा संशोधन अणुभट्टी केंद्रालाही लक्ष्य करण्यात आले.
विशेष म्हणजे, इराणने संयुक्त राष्ट्रांच्या अणु निरीक्षकांना दिलेल्या माहितीप्रमाणे, २०२६ मध्ये अणुभट्टीचे काम सुरू करण्याची योजना आखत आहेत. जड पाण्याच्या अणुभट्ट्या अणुप्रसाराचा धोका निर्माण करत शकतात. त्यामुळे सहजगत्या निर्माण होणाऱ्या प्लुटोनियमचा वापर समृद्ध युरेनियमप्रमाणे बॉम्बचा गाभा बनविण्यासाठी वापरले जाऊ शकते, असा अंदाज बांधण्यात येत आहे. अणुकार्यक्रम, इस्रायली हल्ल्यांचे लक्ष्य हे पूर्णपणे शांततापूर्ण हेतूंसाठी आहे, असे इराणने स्पष्ट केले.(Iran-Israel War)
Join Our WhatsApp Community