भारतीय नौदलाची ताकद वाढणार! INS Vagsheer मुंबईत दाखल होणार

106

नौदलाच्या महत्त्वाकांक्षी P75 स्कॉर्पीन प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेली सहावी पाणबुडी INS वागशीर बुधवारी मुंबईतील माझगाव डॉक येथे दाखल होणार आहे. यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. आज या पाणबुडीचे जलावतरण करण्यात येणार असून ही पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे.

आयएनएस वागशीर ही प्रामुख्याने हल्ला करणारी पाणबुडी आहे. म्हणजेच शत्रूंच्या युद्धनौका पाण्यात बुडविण्यासाठी तयारी ही तयार करण्यात आली आहे. ही डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. त्याची लांबी 221 फूट आणि उंची 40 फूट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही पाणबुडी समुद्राखाली 20 नॉट्स (37 किमी/ता) आणि पृष्ठभागावर 11 नॉट्स (20 किमी/ता) वेगाने जाऊ शकते. ते 350 फूट खोलीपर्यंत जाऊ शकते आणि 50 दिवसांपर्यंत पाण्यात राहू शकते. अहवालानुसार, INS वागशीर 18 टॉर्पेडो वाहून नेऊ शकते.

वागशीरमध्ये स्टेल्थ टेक्नॉलॉजीचा वापर

माझगाव डॉकने या पाणबुडीची बांधणी केली असून संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांच्या मुख्य उपस्थितीत पाणबुडीचे जलावतरण करण्यात येणार आहे. आयएनएन वागशीर ही स्कॉर्पिन वर्गाची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज वागशीर पाणबुडीचे जलावतरण झाल्यानंतर एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी चाचणी आणि परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर ही पाणबुडी युद्धासाठी पूर्णपणे तयार होणार आहे. माझगाव शिपबिल्डर्स लिमिटेडने तयार केलेल्या वागशीर पाणडूबीत अत्याधुनिक तंत्रज्ञानसह स्टेल्थ टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ही पाणबुडी स्कॉर्पीन कलावरी वर्गातील डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी असून ती अत्याधुनिक नेव्हिगेशन आणि ट्रॅकिंग सिस्टमने सुसज्ज आहे.

(हेही वाचा – जुगारासाठी चक्क महाराष्ट्र शासनाच्या गाडीचा वापर!)

वागशीरची वैशिष्ट्ये

  • हे स्कॉर्पीन वाहन कलावरी श्रेणीची डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी आहे.
  • हे अत्याधुनिक नेव्हिगेशन, ट्रॅकिंग सिस्टीमने सुसज्ज आहे
  • यात विविध प्रकारच्या शस्त्रांचाही समावेश आहे
  • कमी आवाजात शत्रूची सहज दिशाभूल करण्याच्या क्षमतेसह 18 टॉर्पेडो धरण्याची क्षमता आहे
  • एकाच वेळी सहा टॉर्पेडो शत्रूवर गोळीबार केला जाऊ शकतो
  • जहाजविरोधी क्षेपणास्त्रे ही पाणबुडीची वैशिष्ट्य आहे
  • हे स्कॉर्पीन वाहन 50 दिवस पाण्यात राहू शकते
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.