भारत फ्रान्सकडून खरेदी करणार २६ Rafale Marine Aircraft; ६३,००० कोटी रुपयांचा करार

Rafale Marine Aircraft : शस्त्रास्त्र खरेदीच्या बाबतीत भारताचा फ्रान्ससोबतचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे.

64

भारत सोमवार, २८ एप्रिल या दिवशी फ्रान्ससोबत २६ राफेल मरीनसाठी विमानांसाठी करार करणार आहे. दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये हा करार होईल. या करारानुसार, भारत फ्रान्सकडून २२ सिंगल सीटर विमाने आणि ४ डबल सीटर विमाने खरेदी करेल. ही विमाने अणुबॉम्ब डागण्याची क्षमता असलेली असतील. (Rafale Marine Aircraft)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २३ एप्रिल या दिवशी झालेल्या सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या (सीसीएस) बैठकीत या विमानाच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली होती. फ्रान्ससोबतचा हा करार सुमारे ६३,००० कोटी रुपयांना होत आहे. शस्त्रास्त्र खरेदीच्या बाबतीत भारताचा फ्रान्ससोबतचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे.

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : वाकोल्यात शोकसभेला हिंसक वळण; १५ जणांवर गुन्हा दाखल, ७ जणांना अटक)

राफेल मरीन आयएनएस विक्रांतवर तैनात असतील

भारत आयएनएस विक्रांतवर राफेल सागरी विमान तैनात करणार आहे. विमान उत्पादक कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने भारताच्या गरजेनुसार या विमानांमध्ये अनेक बदल केले आहेत. यामध्ये जहाजविरोधी हल्ला, अण्वस्त्रे डागण्याची क्षमता आणि १० तासांपर्यंत उड्डाण रेकॉर्डिंग यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. याशिवाय, कंपनी भारताला शस्त्र प्रणाली, सुटे भाग आणि विमानांसाठी आवश्यक साधने देखील पुरवेल. सर्व विमाने २०३१-३२ पर्यंत भारतात पोहोचतील.

राफेल मरीनपूर्वी भारताने फ्रान्सकडून हवाई दलासाठी ३६ राफेल जेट विमाने देखील खरेदी केली आहेत. (Rafale Marine Aircraft)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.