India-Pakistan War : पाकड्यांना भारताच्या लष्करी कारवाईची भीती, इंग्लंडला पळून जाण्याचा इरादा

भारत-पाकिस्तान(India-Pakistan War) यांच्यात कुठल्याही क्षणी युध्द भडकेल अशी स्थिती असताना पाकिस्तानी राजकारण्यांना धडकी भरू लागली आहे.

26

भारत-पाकिस्तान(India-Pakistan War) यांच्यात कुठल्याही क्षणी युध्द भडकेल अशी स्थिती असताना पाकिस्तानी राजकारण्यांना धडकी भरू लागली आहे. पाकिस्तानी राजकारण्यांना भारतीय लष्कराच्या(India-Pakistan War) भीतीने देश सोडून पळून जावेसे वाटत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात चहूबाजूंनी कारवाई करण्याचे मनसुबे उघड केले आहेत. त्यानुसार भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पावले उचलण्यास सुरूवातदेखील केली आहे.

(हेही वाचा India-Pakistan War : पंजाबमध्ये 2 पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक ! वायू सेनेची संवेदनशील माहिती आणि फोटो सापडले … )

दरम्यान, पाकिस्तानचा राजकीय नेता शेर अफजल खान मारवत यांनी नुकतचं एक विधान केले आहे. त्यांना विचारण्यात आले की जर भारत-पाकिस्तान यांच्यात युध्द(India-Pakistan War) भडकले तर तुम्ही काय कराल?, त्यावर पाकिस्तानी नेता म्हणाले, युध्द झाले तर मी इंग्लंडला जाईन. धक्कादायक बाब म्हणजे ते पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी माझे मावसभाऊ आहेत का जेणेकरून ते माझ्या म्हणण्यावरून निर्णय मागे घेतील, असेही शेर अफजल खान मारवत यांनी म्हटले.

दरम्यान, २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटक मृत्युमुखी पडले होते. या पर्यटकांवरील भ्याड हल्ल्यानंतर केंद्र सरकारने जोरदार प्रत्युत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सशस्त्र दलांना दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासंदर्भात वेळ आणि स्वरूप निश्चित करण्यासाठी पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे सीमेपलीकडे पाकिस्तानात एकच भीतीचे वातावरण तयार होताना पाहायला मिळत आहे. (India-Pakistan War)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.