भारतीय लष्कराच्या (Indian Army) आधुनिकीकरणासाठी आणि युद्धात जखमी किंवा शहीद झालेल्या सैनिकांसाठी विशिष्ट बँक खात्यावर देणगी पाठवण्याबाबत व्हॉट्सॲपवर एक दिशाभूल करणारा संदेश सातत्याने फिरत आहे. (fraudulent messages) या संदेशात मंत्रिमंडळाचा याबाबतच्या निर्णयाचा उल्लेख केला आहे आणि या प्रस्तावाचे मुख्य अनुमोदक म्हणून अभिनेता अक्षय कुमार यांचे नाव गोवले जात आहे.
या संदेशातील खात्याबाबतची माहिती चुकीची आहे, ज्यामुळे ऑनलाइन देणग्या अस्वीकृत होतात. लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि अशा फसव्या संदेशांना बळी पडता कामा नये.
A WhatsApp message is going around claiming that government has opened a bank account for the modernization of the Indian Army.#PIBFactCheck
❌ This claim is MISLEADING
❌The bank account mentioned in the message is NOT meant for modernization of Indian Army or for purchase… pic.twitter.com/flm2vGe22G
— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 27, 2025
देणगी कुठे द्यावी ?
सशस्त्र युद्धात शहीद झालेल्या किंवा अपंगत्व आलेल्या सैनिकांसाठी सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.
वर्ष 2020 मध्ये, सरकारने ‘सशस्त्र दल युद्ध दुर्घटना कल्याण निधी (AFBCWF)’ स्थापन केला, ज्याचा वापर सशस्त्र लष्करी कारवायांमध्ये आपले प्राण गमावणाऱ्या किंवा गंभीर जखमी झालेल्या सैनिक/नाविक/वैमानिकांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी केला जातो. संरक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Defence) माजी सैनिक कल्याण विभागाच्या (Ex-Servicemen Welfare Department) वतीने भारतीय सैन्य या निधीच्या हिशोबाची देखरेख करते. सशस्त्र दले युद्ध दुर्घटना कल्याण निधीच्या खात्यात थेट योगदान दिले जाऊ शकते. बँक खात्यांचे तपशील खाली दिले आहेत:
पहिले खाते
निधीचे नाव: सशस्त्र दले युद्ध दुर्घटना कल्याण निधी
बँकेचे नाव: कॅनरा बँक, साउथ ब्लॉक, संरक्षण मुख्यालय नवी दिल्ली – 110011
आयएफएससी कोड: CNRB0019055
खाते क्रमांक: 90552010165915
खात्याचा प्रकार: बचत खाते
दुसरे खाते
निधीचे नाव: सशस्त्र दले युद्ध अपघात कल्याण निधी
बँकेचे नाव: भारतीय स्टेट बँक, संसद मार्ग, नवी दिल्ली – 110011
आयएफएससी कोड: SBIN0000691
खाते क्रमांक: 40650628094
खात्याचा प्रकार बचत खाते
देणग्या AFBCWF च्या नावे नवी दिल्ली येथे देय असलेल्या डिमांड ड्राफ्टद्वारे देखील दिल्या जाऊ शकतात जो टपालाने खालील पत्त्यावर पाठवता येईल:
लेखा विभाग:
सामान्य समायोजन शाखा
शिष्टाचार आणि कल्याण संचालनालय
खोली क्रमांक 281-बी, साउथ ब्लॉक
संरक्षण मंत्रालयाचे एकात्मिक मुख्यालय (लष्कर), नवी दिल्ली – 110011 (Indian Army)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community