Parliament Intrusion case: संसद घुसखोरी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी राजस्थानमधून पुरावे ताब्यात घेतले, ८ सुरक्षा कर्मचारी निलंबित; वाचा नेमकं प्रकरण…

मास्टरमाइंड ललित झा याने सर्व आरोपींचे मोबाईल ताब्यात घेतले होते.

123
Parliament Intrusion case: संसद घुसखोरी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी राजस्थानमधून पुरावे ताब्यात घेतले, ८ सुरक्षा कर्मचारी निलंबित; वाचा नेमकं प्रकरण...
Parliament Intrusion case: संसद घुसखोरी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी राजस्थानमधून पुरावे ताब्यात घेतले, ८ सुरक्षा कर्मचारी निलंबित; वाचा नेमकं प्रकरण...

संसदेत घुसखोरी प्रकरणात मोठे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. दिल्ली पोलिसांनी राजस्थानमधून हे पुरावे ताब्यात घेतले आहेत.

(हेही वाचा- Parliament Attack : संसदेत घुसखोरी करणाऱ्यांवर UAPA अंतर्गत खटला दाखल )

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईलचे जळालेले तुकडे राजस्थानमध्ये सापडले आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाइंड ललित झा याने सर्व आरोपींचे मोबाईल ताब्यात घेतले होते. या मोबाईलचे तुकडे करून ते आगीत जाळून टाकले. हे आगीत जळालेले मोबाईलचे तुकडे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणाबाबत मोठा खुलासा हाती लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आरोपींचे बूट, कपडेही पोलिसांकडून जप्त…
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने संसदेतील घुसखोरी प्रकरणात राजस्थानमधून मोठे पुरावे हस्तगत केले आहेत. यामध्ये आरोपींचे बूट, कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत याशिवाय काही कागदपत्रांचाही यामध्ये समावेश आहे. घुसखोरीच्या प्रकरणावेळी ही कागदपत्रे आरोपींकडे होती, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींकडील हे सर्व पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.

८ सुरक्षा कर्मचारी निलंबित…
संसद भवनाच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाने सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संबंधित ८ कर्मचारऱ्यांना निलंबित केले आहे. रामपाल, अरविंद, वीरदास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित, नरेंद्र अशी या कर्मचाऱ्यांची नावे असल्याची माहिती मिळाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.