Defense Exports : सरत्या आर्थिक वर्षात संरक्षण क्षेत्राची अशीही गरुडभरारी; संरक्षणमंत्र्यांनी केले कौतुक

Defense Exports : आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये संरक्षण निर्यातदारांना जारी करण्यात आलेल्या निर्यात परवान्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मधील 1,414 निर्यात परवान्यांच्या तुलनेत 2023-24 मध्ये ही संख्या 1,507 वर पोहोचली आहे.

104
Defense Exports : सरत्या आर्थिक वर्षात संरक्षण क्षेत्राची अशीही गरुडभरारी; संरक्षणमंत्र्यांनी केले कौतुक
Defense Exports : सरत्या आर्थिक वर्षात संरक्षण क्षेत्राची अशीही गरुडभरारी; संरक्षणमंत्र्यांनी केले कौतुक

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये संरक्षण निर्यातीने विक्रमी 21,083 कोटी (सुमारे 2.63 अब्ज अमेरिकन डॉलर्स) रुपयांचा उच्चांक गाठला आहे. जी गेल्या आर्थिक वर्षातील 15,920 कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीच्या तुलनेत 32.5% नी अधिक आहे. आर्थिक वर्ष 2013-14 च्या तुलनेत गेल्या 10 वर्षांत संरक्षण निर्यात 31 पटीने वाढल्याचे या ताज्या आकडेवारीवरून दिसून येते. (Defense Exports)

संरक्षण उद्योग, संरक्षण क्षेत्रातील खाजगी कंपन्या आणि सार्वजनिक उपक्रमांनी सर्वोच्च संरक्षण निर्यात साध्य करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले आहेत. या आकडेवारीत खाजगी क्षेत्र आणि संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांचे योगदान अनुक्रमे 60% आणि 40% आहे.

(हेही वाचा – Ramdas Athawale: भारत तोडोचं काम करणारे आता भारत जोडायला निघाले आहेत; रामदास आठवलेंची राहुल गांधींवर घणाघाती टीका)

निर्यात परवान्यांच्या संख्येत वाढ

याव्यतिरिक्त, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये संरक्षण निर्यातदारांना जारी करण्यात आलेल्या निर्यात परवान्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मधील 1,414 निर्यात परवान्यांच्या तुलनेत 2023-24 मध्ये ही संख्या 1,507 वर पोहोचली आहे.

दोन दशकांची तुलनात्मक आकडेवारी म्हणजे 2004-05 ते 2013-14 आणि 2014-15 ते 2023-24 या कालावधीत संरक्षण निर्यातीत 21 पट वाढ झाल्याचे दिसून येते. 2004-05 ते 2013-14 या कालावधीत एकूण संरक्षण निर्यात 4,312 कोटी रुपये होती, जी 2014-15 ते 2023-24 या कालावधीत 88,319 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

ही वृद्धी भारतीय संरक्षण उत्पादने आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक मान्यतेचे प्रतिबिंब आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी X या समाज माध्यमावरील पोस्टद्वारे संरक्षण निर्यातीत नवा टप्पा पार केल्याबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आहे. (Defense Exports)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.