पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आता पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याच्या मनस्थितीत आहे. भारत आता पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत दिसत आहे.भारताने सीमा बंद केल्या, सिंधू नदीचे पाणी रोखले, आता युद्धाची तयारी सुरु केली आहे. हायपरसोनिक शस्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अॅडव्हान्स्ड स्क्रॅमजेट कनेक्टेड टेस्ट फॅसिलिटी (SCPT)ची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. याआधी भारतीय नौदलाने अरबी समुद्रात या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. आता भारताचे सैन्य (Army) सज्ज झाले आहे.
डीआरडीओने म्हटले आहे की, हैदराबादस्थित डीआरडीएल प्रयोगशाळेने हायपरसोनिक शस्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे . डीआरडीएलने २५ एप्रिल २०२५ला हैदराबाद मध्ये नव्याने निर्माण केलेल्या अॅडव्हान्स्ड स्क्रॅमजेट कनेक्टेड टेस्ट फॅसिलिटी (एससीपीटी) येथे १००० सेकंदांपेक्षा जास्त कालावधीसाठी अॅक्टिव्ह कूल्ड स्क्रॅमजेट सबस्केल कम्बस्टरची ग्राउंड टेस्टिंग केली. ही ग्राउंड टेस्टिंग जानेवारी २०२५ मध्ये १२० सेकंदांसाठी घेण्यात आलेल्या पूर्वीच्या चाचणीचा पुढील टप्पा आहे. आजच्या यशस्वी चाचणीसह ही प्रणाली लवकरच संपूर्ण ताकदीने कॉम्बस्टर चाचणीसाठी तयार होणार आहे. (Army)
(हेही वाचा सरकारचे Press Media ला आदेश, कुठल्याही सैनिकी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; अन्यथा कारवाई करू)
तत्पूर्वी, पहलगाम हल्ल्याच्या ४८ तासांच्या आत भारताने गुरुवारी युद्धनौका आयएनएस सुरतमधून क्षेपणास्त्राची चाचणी केली ज्यातून शत्रूंना कडक संदेश दिला आहे. नौदलाने (Army) मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागले आहे. नौदलाच्या म्हणण्यानुसार, या काळात भारताचे स्वदेशी क्षेपणास्त्र विध्वंसक नौका आयएनएस सुरतने समुद्रात लक्ष्य गाठण्यात यश मिळवले आहे. या चाचणी दरम्यान, भारतीय नौदलाच्या नवीनतम स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र विनाशक आयएनएस सुरतने समुद्रात अचूकपणे हल्ला केला आहे.
काही दिवसांपूर्वीच, डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने स्वदेशी रुपात विकसित केलेल्या व्हर्टिकल-लांच्ड शॉर्ट-रेंज सरफेस-टू-एअर क्षेपणास्त्राची (VLSRSAM) यशस्वी चाचणी घेतली होती. ही चाचणी २६ मार्चला दुपारी १२ वाजता ओडिशा किनाऱ्यावरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) येथून घेण्यात आली. या कालावधीत, क्षेपणास्त्राने जमिनीवरून येणाऱ्या उभ्या लाँचरवरून अतिशय जवळून आणि कमी उंचीवर असलेल्या एका हाय-स्पीड हवाई लक्ष्याला हाणून पाडले होते. (Army)
Join Our WhatsApp Community