Mumbai News : वांद्रे-वरळी सीलिंकवर बुलेट गर्लचा ड्रामा

99
Mumbai News : वांद्रे-वरळी सीलिंकवर बुलेट गर्लचा ड्रामा
Mumbai News : वांद्रे-वरळी सीलिंकवर बुलेट गर्लचा ड्रामा

वाहतुकीचे सर्व नियम मोडून वांद्रे-वरळी सीलिंकवर बुलेट घेऊन घुसलेल्या एका तरुणीला पोलिसांनी अडवताच पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या बुलेट गर्लचा दबंगगिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. “माझ्या बापाचा रोड आहे, मी रोड टॅक्स भरते त्यामुळे मला कोणी रोखू शकत नाही, या पद्धतीने या तरुणीने वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालून तीने पोलिसांच्या दिशेने पिस्तुलसदृश वस्तू फेकली. अखेर या तरुणीच्या दबंगगिरीला चाप लावण्यासाठी महिला पोलिसांनी बळाचा वापर करत तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून तिच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

नुपूर मुकेश पटेल असे या तरुणीचे नाव आहे. मूळची मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर येथे राहणारी नुपूर आर्किटेक्ट आहे. शुक्रवारी भरदिवसा ती पुण्याहून आपल्या बुलेट या मोटार सायकल वरून मुंबईत आली होती. वांद्रे येथून वरळीला जाण्यासाठी तीने दुचाकीला बंदी असणाऱ्या वांद्रे वरळी सीलिंकवर बुलेट टाकली. सीलिंक वरील टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांनी तिला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती न थांबता वरळीच्या दिशेने सुसाट निघाली. या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना दिल्यानंतर या तरुणीला वाहतूक पोलिसांनी सीलिंकवर थांबवले. बुलेट मोटारसायकल चालवणाऱ्या या तरुणीने हेल्मेट सुद्धा परिधान केले नव्हते. वाहतुक पोलिसांनी तीला मोटारसायकल बंद करून बुलेट रस्त्याच्या कडेला घेण्यास सांगितले असता तीने वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

(हेही वाचा – Yogi Adityanath : विद्यार्थिनीचा विनयभंग होतांना तुम्ही काय करत होतात? योगी आदित्यनाथ यांनी पोलीस अधीक्षकाला सुनावले)

या बुलेट गर्लची दबंगगिरी सुरु असताना काही जणांनी त्याचे चित्रीकरण मोबाईल मध्ये कैद केले. अखेर महिला पोलिसांनी मध्यस्थी करून या बुलेट गर्लला ताब्यात घेऊन वरळी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्यात देखील तीने पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी अखेर तीला शांत केले. तिने अनावश्यक वाद घातला आणि एका हवालदाराला धक्काबुक्कीही केली. आम्ही तिच्यावर कलम १८६ (सार्वजनिक कार्यात सार्वजनिक सेवकाला अडथळा आणणे), २७९ (सार्वजनिक मार्गावर बेशिस्तपणे वाहन चालवणे किंवा दुचाकी चालवणे), ३३६ (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारे कृत्य), ३५३ (सरकारी कामात अडथळा निर्माण करणे) मोटार वाहन कायदा, १९८८अंतर्गत गुन्हा दाखल केला करण्यात आला असून तिला फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम ४१(अ) अंतर्गत तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली आणि तिला जाण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती एका अधिकारी यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.