Mumbai Crime : व्याजाच्या पैशांसाठी सावकाराकडून महिलेवर अतिप्रसंग

या प्रकरणी नवघर पोलिसांनी विजय जनार्दन खामकर या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

102
Mumbai Crime : व्याजाच्या पैशांसाठी सावकाराकडून महिलेवर अतिप्रसंग
Mumbai Crime : व्याजाच्या पैशांसाठी सावकाराकडून महिलेवर अतिप्रसंग

व्याजाने घेतलेले पैसे परतफेड करून देखील सावकाराने (money lender) एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग (woman harassed) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुलुंड पूर्वेत घडली. या प्रकरणी नवघर पोलिसांनी (Navghar Police) या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. (Mumbai Crime)

विजय जनार्दन खामकर (Vijay Janardhan Khamkar) असे अटक करण्यात आलेल्या सावकाराचे नाव असून खामकर हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्याच्याकडे पैसे व्याजाने पैसे देण्याचा कुठलाही परवाना नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित महिला ही कांजूरमार्ग या ठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षकाचे काम करते. पीडितेच्या पतीचे कोरोना काळात निधन झाले आहे. १६ वर्षाच्या मुलासह पीडिता ही मुलुंड पूर्व म्हाडा वसाहत या ठिकाणी राहते. २०२२ मध्ये पीडितेने घराचे भाडे देण्यासाठी खामकर यांच्याकडून १० टक्के व्याजाने १५ हजार रुपये घेतले होते, ती दरमहा खामकर याला व्याज वेळेवर देत होती. (Mumbai Crime)

दिवाळीचा सण असल्यामुळे या महिन्यात पीडितेकडून खामकर याला व्याज वेळेवर मिळाले नाही म्हणून शनिवारी खामकर हा व्याजाचे पैसे घेण्यासाठी सकाळीच पीडितेच्या घरात घुसला. पीडित महिला ही घरात एकटीच होती, खामकरने संधी साधून तिला मागून मिठी मारली, पीडितेने प्रतिकार केला असता त्याने तिचा गळा पकडून तीचा गाऊन खेचून तीच्यावर बळजबरी करू लागला. (Mumbai Crime)

(हेही वाचा – IPL 2024 : कुठल्या संघाने कुणाला आपल्याकडे कायम राखलं, कोणत्या खेळाडूंचा होणार लिलाव?)

अचानक झालेल्या या प्रसंगाने घाबरलेल्या पीडितेने स्वतःचा बचाव करण्यासाठी आरडाओरडा करताच खामकर याने घरातून पळ काढला परंतु घरातून जाताना पीडितेला धमकी देऊन गेला. मुलगा घरी आल्यानंतर तीने घडलेला प्रकार मुलाला सांगितला व दोघे नवघर पोलीस ठाण्यात (Navghar Police Station) तक्रार देण्यासाठी आले. नवघर पोलिसांनी खामकर यांच्यावर ४५२ (दुखापत, हल्ला किंवा चुकीच्या पद्धतीने आवर घालण्याची तयारी केल्यानंतर घरामध्ये घुसखोरी करणे), ३५४(ब) (विनयभंग करून मारहाण करणे किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे), ३२३ (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), ५०४ (हेतूपूर्वक अपमान करणे) ५०६(गुन्हेगारी धमकी) आणि ५०९ (अश्लीला हावभाव, एखाद्या महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतूने केलेले कृत्य), आणि कलम ३९ (वैध परवान्याशिवाय सावकारी करणे) आणि महाराष्ट्र मनी-च्या इतर कर्ज (नियमन) अधिनियम, २०१४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून खामकर याला अटक करण्यात आली आहे. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.