महिला डॉक्टरवर वॉर्डबॉयकडून कात्रीने हल्ला!

100

नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये एका वॉर्डबॉयने किरकोळ वादातून महिला डॉक्टरवर कात्रीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. डॉक्टर महिलेवर वॉर्डबॉयने हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. मंगळवारी गंगापूररोड येथील निम्स हॉस्पिटलमध्ये किरकोळ कारणावरून वॉर्डबॉयने डॉ.सोनल दराडे यांच्या मानेवर आणि पोटात कात्रीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. आरोपीच्या नर्स मैत्रिणीला डॉक्टर ओरडल्यामुळे अनिकेत डोंगरेंने डॉ.सोनल दराडे यांच्यावर हा हल्ला केला.

( हेही वाचा : सावधान! ३१ डिसेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्सवर बंद होणार व्हॉट्सअ‍ॅप! )

या हल्ल्याचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे. डॉ. सोनल या बेसावधपणे आपले काम करत असताना मागून येऊन वॉर्डबॉय डोंगरेने त्यांच्या मानेवर आणि पोटावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत डॉ.सोनल या गंभीर जखमी झाल्या आहेत. हल्ला झाल्यावर तात्काळ बाजूला उभ्या असलेल्या सहकारी नर्सने डॉ. सोनल यांना अधिक उपचारासाठी नेले होते. या घटनेतील आरोपी अनिकेत डोंगरे याला गंगापूर पोलिसांनी अटक केली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.