Wadhawan Brothers : वाधवान बंधू ऐषोआरामात राहतायेत कारागृहात; मिटिंग, कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पागोष्टी, मोबाईल, लॅपटॉप आणि बरेच काही…   

185

देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यातील आरोपावरून डिएचएफएलचे माजी संचालक कपिल आणि धीरज वाधवान सध्या नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये आहेत. देशातील १७ बँकांना चुना लावणारे वाधवान बंधू Wadhawan Brothers कारागृहात मात्र ऐषोआरामात शिक्षा जेलमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय चाचणीच्या नावाखाली आठवड्यातून अनेकदा कारागृहामधून हॉस्पिटलला जातात. तेथील पार्किंगमध्ये त्यांची विविध लोकांसोबत मिटिंग होते, वाधवान कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पागोष्टी करतात, इतकेच नाही तर दोघे मोबाईल-लॅपटॉपचा वापर करतात. घरातील आणलेले जेवण जेवतात असा प्रकार आता समोर आला आहे.

हेही पहा – 

वाधवान बंधू Wadhawan Brothers मेडिकल चाचणीसाठी आठवड्यातून ३-४ वेळा जेलमधून हॉस्पिटलला जातात. मागील वेळी ७ ऑगस्ट रोजी मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये कपिल वाधवान यांना चेकअपसाठी आणले होते. तर ९ ऑगस्टला धीरज वाधवान यांना जेजे रुग्णालयात आणले होते. याठिकाणी वाधवान बंधू Wadhawan Brothers उपचारांऐवजी आपापल्या कारमध्ये बसून कुटुंबातील सदस्य आणि निकटच्या लोकांना भेटत होते. कारमध्ये कौटुंबिक विषयांपासून उद्योगाशी निगडीत चर्चा केल्या जातात. अनेक तास हा प्रकार सुरू असतो. या दोन्ही भावंडांना जेव्हापासून तळोजामध्ये ठेवले आहे तेव्हापासून ही स्पेशल ट्रिटमेंट दिली जात आहे. ‘आजतक’ या हिंदी वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हे सर्व कैद झाले आहे. या संबंधीचे वृत्त येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संबंधित प्रकरणाचा तपास केला जाईल. यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू असे त्यांनी सांगितले. राज्यात कठोर लॉकडाऊन असताना कुणालाही अनावश्यक बाहेर फिरणे यावर बंदी होती. अशा काळात वाधवान बंधू ५ अलिशान गाड्यांमधून कुटुंबातील २३ सदस्यांना घेऊन मुंबईहून महाबळेश्वर गाठले होते. या प्रकरणावरून भाजपाने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.