Ayodhya Ram Mandir ATS : प्रतिष्ठापने पूर्वी उत्तर प्रदेश ATS ने तीन संशयितांना पकडले; चौकशी सुरू

अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सोहळ्यापूर्वीच उत्तर प्रदेश मध्ये ATS ने तीन संशयितांना पकडले.

220
Ayodhya Ram Mandir ATS : प्रतिष्ठापने पूर्वी उत्तर प्रदेश ATS ने तीन संशयितांना पकडले; चौकशी सुरू

राम मंदिर प्राण प्रतिष्ठेबद्दल देशभरात उत्साह आहे, तर उत्तर प्रदेश एटीएस सतर्क आहे. एटीएस संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. बुधवारी ए. टी. एस. (ATS) ने अलीगढ येथून आय. एस. आय. एस. (ISIS) चा संशयित दहशतवादी फैजान याला अटक केली. गुरुवारी (१८ जानेवारी) एटीएसने अयोध्येतून तीन संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांच्या अटकेनंतर राम मंदिराजवळ हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.(Ayodhya Ram Mandir ATS )

कायदा आणि सुव्यवस्थेचे महासंचालक प्रशांत कुमार म्हणाले की संशयितांची चौकशी केली जात आहे. आतापर्यंत त्यांचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध आलेला नाही. तथापि, सूत्रांनी सांगितले की, अटक केलेल्या संशयितांचे कॅनडामध्ये ठार झालेल्या सुखा डुंके आणि अर्श डाला टोळीशी संबंध आहेत. ए. टी. एस. ने धरमवीर आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. या तिघांचीही चौकशी केली जात आहे. (Ayodhya Ram Mandir ATS )

(हेही वाचा : Ram Mandir Ayodhya : चला, रामराज्याच्या दिशेने वाटचाल करूया!)

एक तपास पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे. तो मूळचा राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील रहिवासी आहे. अर्श दालाला राष्ट्रीय तपास संस्थेने वॉन्टेड घोषित केले आहे. भारत सरकारनेही त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.मात्र अयोध्येसह संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.एसपीजी, सीआयएसएफ,स्पेशल कमांडो, सीआरपीएफ, आणि एटीएस यांनी अयोध्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेचा चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. अयोध्येजवळच्या सर्व सीमा या सील करण्यात आल्या आहेत. अयोध्येत राम मंदिरमध्ये २२ जानेवारी रोजी रामललांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.