-
प्रतिनिधी
क्रॉफर्ड मार्केट येथील बीएमसी (मार्केट विभाग) च्या वरिष्ठ निरीक्षकासह तीन बीएमसी अधिकाऱ्यांना योग क्लासच्या मालकाकडून १०,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा , १९८८ च्या कलम ७ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Bribery)
(हेही वाचा – India-Pakistan Border : BSF ने उधळून लावला दहशतवादी कट ; सीमेवरून हातबॉम्ब, काडतुसे, ३ पिस्तूल जप्त)
मुख्य निरीक्षक संजय वसंत घोलप, तुळशीदाम मधुकर कडू, रामदाम कोंडविलकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहे. तक्रारदार, हे २०२३ पासून व्हीएमआय (मार्केट डिव्हिजन) जवळील रिकाम्या जागेत मुलांसाठी योग सत्रे आयोजित करत आहे. त्यांना १ आणि १९ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई महानगरपालिकेकडून जागेच्या वापराशी संबंधित कारवाईचा इशारा देण्यात आला. (Bribery)
(हेही वाचा – Crime News : नैनीतालमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मोहम्मद उस्मानवर गुन्हा दाखल ; हिंदू संघटनांनी केला निषेध)
तक्रारीनुसार, घोलप यांनी तक्रारदाराला बोलावून सांगितले की, “जर तुम्हाला तिसरी नोटीस नको असेल तर तुम्हाला दरमहा १०,००० रुपये द्यावे लागतील.” लाच देण्यास तयार नसल्याने, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून १० हजार १ रुपयांची लाच स्वीकारताना मुख्य निरीक्षक संजय वसंत घोलप, तुळशीदाम मधुकर कडू, रामदाम कोंडविलकर यांना अटक करण्यात आली. (Bribery)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community