Suicide : फोटो व्हायरल होण्याच्या भीतीने १७ वर्षीय मुलीची आत्महत्या; प्रियकराला अटक

दोघांच्या प्रेम प्रकरणाबाबत मुलीच्या कुटुंबियांना कळाल्यानंतर त्यांनी त्याला विरोध केला होता व शुभम सोबतचे संबंध तोडण्यास सांगितले होते.

154
Women Suicide Atal Setu : वरळी सी लिंक पाठोपाठ अटल सेतु बनला आत्महत्येचा नवीन स्पॉट

फोटो व्हायरल होण्याच्या भीतीने १७ वर्षीय मुलीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या Suicide केल्याची घटना लोअर परळ येथे घडली. या प्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

शुभम जाधव (१९) असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. सात रस्ता धोबी तलाव येथे राहणारा शुभम याचे त्याच परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरु होते. या दोघांच्या प्रेम प्रकरणाबाबत मुलीच्या कुटुंबियांना कळाल्यानंतर त्यांनी त्याला विरोध केला होता व शुभम सोबतचे संबंध तोडण्यास सांगितले होते.

(हेही वाचा आरे, समृद्धी, पोर्ट अन् आता रिफायनरीला विरोध, ही सुपारी कुणाकडून? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

त्यानंतर देखील शुभम हा प्रेयसीला भेटायला बोलावत होता, अखेर मुलीच्या कुटुंबियांनी सात रस्ता येथील भाड्याचे घर सोडून लोअर परळ बावला मस्जिद या ठिकाणी एका इमारतीत घर भाड्याने घेऊन राहू लागले. त्यानंतर देखील शुभम हा प्रेयसीला भेटण्यासाठी लोढा इमारत येथे बोलावू लागला. रविवारी सायंकाळी बळीत मुलगी ही लहान बहिणीसोबत पाळीव कुत्र्याला फिरविण्यासाठी लोढा येथे गेली असता त्या ठिकाणी शुभम तिला भेटायला आला व तू भेटायला का येत नाही असे बोलून तिला मारहाण करू लागला. यापुढे भेटायला आली नाही तर मोबाईलमध्ये असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी शुभमने तिला दिली होती.

घाबरलेल्या अवस्थेत घरी आलेल्या बळीत मुलीने फोटो व्हायरल होऊन बदनामी होण्याच्या भीतीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडू टाकून आत्महत्या Suicide केली. स्थानिकांनी जखमी अवस्थेत तिला उपाचारासाठी केईएम येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.