Suicide : यूपीच्या तरुणाची मुंबईमधील हॉटेलमध्ये आत्महत्या

पोलिसांनी हॉटेल कर्मचारी यांच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश केला असता सूरज हा गळफास (Suicide) लावलेल्या अवस्थेत आढळून आला, तसेच त्याच्या डाव्या हाताची नस देखील कापलेली होती.

114
Suicide
Suicide : यूपीच्या तरुणाची मुंबईमधील हॉटेलमध्ये आत्महत्या

नोकरीच्या शोधात मुंबईमध्ये आलेल्या तरुणाने हॉटेलच्या खोलीत स्वतःच्या हाताची नस कापून त्यानंतर गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली आहे. ही घटना बुधवार २४ मे २०२३ रोजी सायन धारावी या परिसरात घडली. या प्रकरणी धारावी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद (Suicide) घेतली आहे. या तरुणाच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती धारावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी दिली आहे.

(हेही वाचा – HSC 2023 Result : आज बारावीचा निकाल; दुपारी २ वाजता ऑनलाईन पाहता येणार)

आत्महत्या (Suicide) करण्यात आलेल्या तरुणाची ओळख पटविण्यात आली असून सूरज सिंह बागेल असे या तरुणाचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे राहणारा सूरज हा नोकरीच्या शोधात काही दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. सायन येथील एका हॉटेलमध्ये तीन दिवसांपूर्वी त्याने एक खोली भाड्याने घेतली होती. मात्र बुधवारी दुपारी सूरज च्या खोलीतून कुठलीही हालचाल जाणवत नसल्यामुळे हॉटल कर्मचारी यांनी सूरजच्या खोलीचे दार ठोठावले मात्र आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर धारावी पोलिसांना कळविण्यात आले.

हेही पहा – 

पोलिसांनी हॉटेल कर्मचारी यांच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश केला असता सूरज हा गळफास (Suicide) लावलेल्या अवस्थेत आढळून आला, तसेच त्याच्या डाव्या हाताची नस देखील कापलेली होती.

पोलिसांनी सूरजला खाली उतरवून त्याला उपचारासाठी सायन रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत (Suicide) घोषित केले. याप्रकरणी धारावी पोलिसांनी अपमृत्युची नोंद दाखल केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.