Tahawwur Rana : २६/११ च्या हल्ल्यातील संशयित तहव्वूर राणाला भारतात आणण्याच्या हालचालीला वेग

63
Tahawwur Rana : २६/११ च्या हल्ल्यातील संशयित तहव्वूर राणाला भारतात आणण्याच्या हालचालीला वेग
Tahawwur Rana : २६/११ च्या हल्ल्यातील संशयित तहव्वूर राणाला भारतात आणण्याच्या हालचालीला वेग

मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यातील संशयित दहशतवादी तहव्वूर राणा याला भारतात आणण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेकडून हालचाली सुरू करण्यात येत आहे. तहव्वूर राणा विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यासाठी गुन्हे शाखेकडून लवकरच न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

तहव्वूर राणा (६२) याच्याविरुद्ध २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेने मंगळवारी विशेष न्यायालया समोर तहव्वूर राणा याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. लवकरच पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या जातील, अशी माहिती गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

(हेही वाचा – Ganesh Visarjan 2023 : गणेश विसर्जनासाठी २० हजार मुंबई पोलीस सज्ज)

राणा ११ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई शहरात आला होता आणि २१ नोव्हेंबर पर्यंत तो देशातच राहिला होता. दोन दिवस पवईच्या हॉटेलमध्ये होता. त्याने उरलेले दिवस कुठे घालवले याचा तपशील शोधण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेकडून करण्यात येत असल्याचे अधिकारी म्हणाले. २२ नोव्हेंबर रोजी राणा दुबईला रवाना झाला आणि नंतर चीनला गेला. त्यानंतर तो शिकागोला गेला, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.