Shivaji Park : शिवाजी पार्क शिवसेना दोन गटातील राडा प्रकरणी गुन्हा दाखल 

110
Shivaji Park : शिवाजी पार्क शिवसेना दोन गटातील राडा प्रकरणी गुन्हा दाखल 
Shivaji Park : शिवाजी पार्क शिवसेना दोन गटातील राडा प्रकरणी गुन्हा दाखल 
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी शिवसेनेच्या दोन गटात गुरुवारी रात्री झालेल्या राड्याप्रकरणी शिवाजी पार्क (Shivaji Park) पोलिसांनी शुक्रवारी ५० ते ६० अज्ञात व्यक्ति विरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तसेच वृत्त वाहिन्यांनी प्रसारित केलेल्या फुटेज वरून आरोपीची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्व संध्येला दादर शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या स्मृती स्थळाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेऊन गेल्यानंतर काही वेळाने त्या ठिकाणी उबाठा गट आणि शिंदे गटाचे शिवसैनिक दाखल झाले होते. स्मृती स्थळावर दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

दरम्यान दोन्ही गट आमनेसामने आले व दोन्ही गटातील शिवसैनिकानी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले.दोन्ही गटाच्या घोषणाबाजी आणि आरोप प्रत्यारोप मुळे शिवाजी पार्क परिसरात तणाव निर्माण झाला.घटनास्थळी असलेल्या पोलिसांकडून दोन्ही गटांना स्मृतीस्थळावरून बाहेर काढून त्यांना शांततेचे आवाहन करण्यात येत होते.परंतु दोन्ही गट ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता दोन्ही गटातील शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले त्यात स्मृतीस्थळाच्या सुरक्षेसाठी असलेले स्टील पाईपचे कुंपण तुटले.(हेही वाचा-Ramdas Kadam : बाळासाहेबांची मातोश्री आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीची झाली, रामदास कदम यांचा घणाघात)

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी अधिक कुमक मागवून दोन्ही गटातील शिवसैनिकांना स्मृती स्थळावरून बाहेर काढून त्यांना शांततेचे आव्हान करण्यात आले. रात्री उशिरा येथील वातावरण निवळले असले तरी तणावपूर्ण शांतता होती. शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर  शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दुपारी ५० ते ६० अज्ञात व्यक्ती विरोधात दंगल माजविणे, तसेच शांतता भंग करणे सह मुंबई पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

एका पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री तसेच शुक्रवारी सकाळ पर्यत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी दोन्ही गटांकडून कोणीही आले नाही, त्यानंतर पोलिसांनी सरकारच्या वतीने तक्रार दाखल केली आहे. आरोपीच्या शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि वृत्तवाहिणीवरील फुटेज ताब्यात घेऊन आरोपीची ओळख पटविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=yGDSuB1f5So&t=664s

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.