Sandeshkhali : ईडी दाखल करणार सरकार विरोधात अवमान याचिका

तृणमूल नेता शहाजहां शेखच्या कस्टडीचे प्रकरण

147
Sandeshkhali : टीएमसीच्या राज्यात महिलांवर अत्याचार; मोदींनी घेतली संदेशखालीच्या पिडीत महिलांची भेट
Sandeshkhali : ईडी दाखल करणार सरकार विरोधात अवमान याचिका

तृणमूल काँग्रेसचा नेता (Trinamool Congress) शहाजहान शेख (ShahJahan Sheikh) आणि संदेशखालीच्या मुद्द्यावर पश्चिम बंगाल सरकार अडकल्याचे दिसत आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने ईडीला बंगाल सरकारविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे. (Sandeshkhali)

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पश्चिम बंगाल पोलिसांनी टीएमसी नेते शाहजहान शेखला सीबीआयकडे सोपवण्यास नकार दिला होता. (Sandeshkhali) ईडीच्या वतीने डेप्युटी सॉलिसिटर जनरल धीरज त्रिवेदी यांनी उच्च न्यायालयाकडे बंगाल सरकारच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्याची आणि त्यावर लवकरच सुनावणी घेण्याची परवानगी मागितली. त्याला हायकोर्टाने मंजुरी दिलीय. कोलकाता उच्च न्यायालयातील न्या. हरीश टंडन आणि न्या. हिरण्मय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने ईडीला बंगाल सरकारविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाने मंगळवारी ईडीच्या पथकावरील हल्ल्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आणि शहाजहान शेखचा (ShahJahan Sheikh) ताबा सीबीआयकडे देण्याचे निर्देश दिले होते. (Sandeshkhali)

(हेही वाचा- Pune Metro : रुबी हॉल ते रामवाडी विस्तारित मेट्रो मार्गाला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा)

न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयचे पथक मंगळवारी भवानी भवनातील सीआयडी मुख्यालयात सुमारे 2 तास प्रतीक्षा केल्यानंतर परतले, मात्र बंगाल सरकारने उच्च न्यायालयाचे उल्लंघन केल्याचे सांगत शाहजहान शेखचा (ShahJahan Sheikh) ताबा सीबीआयकडे देण्यास बंगाल पोलिसांनी नकार दिला. हायकोर्टाने दिलेल्या आदेशाच्या याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शाहजहान शेखचा (ShahJahan Sheikh) ताबा सीबीआयकडे सोपवण्याच्या निर्णयाला बंगाल सरकारने विरोध केला असून या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणावर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. (Sandeshkhali)

शाहजहान शेख (ShahJahan Sheikh) रेशन घोटाळ्यात आरोपी असून 5 जानेवारी रोजी रेशन घोटाळ्यातील शहाजहान शेखच्या घरावर छापा टाकण्यासाठी ईडीचे पथक संदेशखळी येथे पोहोचले होते, मात्र शाहजहान शेखच्या समर्थकांनी ईडीच्या पथकावर दगडफेक केली. या प्रकरणात ईडीचे अनेक अधिकारी जखमी झाले आहेत. या हल्ल्याप्रकरणी ईडीने शाहजहान शेखविरोधात (ShahJahan Sheikh) गुन्हा दाखल केला होता. अलीकडेच, शाहजहान शेखसह टीएमसी नेत्यांवर संदेशखाली येथील लोकांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा आणि महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. बराच गदारोळ झाल्यानंतर शाहजहान शेखला बंगाल पोलिसांनी 29 फेब्रुवारी रोजी अटक केली. बंगाल सरकारने शाहजहान शेख (ShahJahan Sheikh) प्रकरणाचा तपास सीआयडीकडे करण्याचे आदेश दिले होते. (Sandeshkhali)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.