Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ७ जणांचा जागीच मृत्यू, ४ जखमी!

183
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ७ जणांचा जागीच मृत्यू, ४ जखमी!
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ७ जणांचा जागीच मृत्यू, ४ जखमी!

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (Samruddhi Mahamarg Accident) घडला आहे. या अपघातात सात जणांचा जागेवरच मृत्यू झाल्याचे समोर आले आहेत. तर या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जालन्यातील कडवंची गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. दोन कारची समोरा समोर धडक बसून हा अपघात घडला आहे.

(हेही वाचा –झारखंड: NEET Pepar लीक प्रकरणी तिघांना अटक)

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (Samruddhi Mahamarg Accident) घडला असून यात सात जणांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली. गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं असून 4 जखमींना उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जालन्यातील कडवंची गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दोन्हीही कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून खाली

नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या आर्टीगा कारला विरुद्ध दिशेने डिझेल भरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात (Samruddhi Mahamarg Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्यानंतर अर्टीगा आणि स्विफ्ट डिझायर या दोन्हीही कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून खाली गेल्याची माहिती आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कडवंची गावाजवळ ही घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत बचाव कार्य करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. पण हा अपघात इतका भीषण होता की. दोन्ही कारचा अक्षरक्षा चक्काचुर झाला आहे. (Samruddhi Mahamarg Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.