Salman’s security : धमकीच्या पोस्टनंतर  मुंबई पोलिसांकडून सलमानच्या सुरक्षेचा आढावा

54
Salman's security : धमकीच्या पोस्टनंतर  मुंबई पोलिसांकडून सलमानच्या सुरक्षेचा आढावा
Salman's security : धमकीच्या पोस्टनंतर  मुंबई पोलिसांकडून सलमानच्या सुरक्षेचा आढावा
अभिनेता सलमान खानला गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सोशल मीडिया अकाउंटवरून धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेचा (Salman’s security) आढावा घेतला आहे. पोलिसांनीही सलमानला धमकीची माहिती दिली आहे. सलमानला आधीच पोलिसांकडून वाय प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे.
पंजाबी गायक-अभिनेता गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडातील घरावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट करताना, बिश्नोईने कॅनडात गिप्पी ग्रेवालच्या घराबाहेर गोळीबार केल्याचे म्हटले  आहे आणि गिप्पीला त्याचा मित्र सलमान खानला या बाबत कळविण्यास सांगितले आहे की, त्याला कोणीही वाचवू शकत नाही.
कॅनडातील व्हँकुव्हरमधील व्हाईट रॉक परिसरात गिप्पी ग्रेवाल यांचा बंगला असून, रविवारी गोळीबाराची घटना घडली. गिप्पीच्या बंगल्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर बिश्नोई यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली, त्यात त्याने लिहले की, “तुम्ही सलमान खानला मोठ्या भावाप्रमाणे वागवा. आता मला सांगा, तुमच्या भावाने तुम्हाला वाचवले पाहिजे, आणि हा सलमान खानला (Salman’s security) एक संदेश आहे की  दाऊद मदत करेल या भ्रमात तुम्ही आहात. तुला आमच्यापासून कोणी वाचवू शकत नाही.”

(हेही वाचा-Double Decker Bus : वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक आता डबल डेकर बसने करा गारेगार प्रवास)

यावर गिप्पीने एका वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया देत तो सलमान खानचा मित्र नसल्याचे सांगितले. गिप्पीने चॅनलला सांगितले की तो सलमान खानला फक्त दोनदा भेटला आहे, एकदा त्याचा पंजाबी चित्रपट ‘मौजान ही मौजान’ च्या ट्रेलर लॉन्चवेळी आणि दुसऱ्यांदा बिग बॉसच्या सेटवर.
मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अभिनेता सलमान खानला (Salman’s security) आधीपासूनच पोलिसांकडून वाय प्लस  सुरक्षा आहे. खान यांच्या सुरक्षेत  एक पोलिस अधिकारी आणि चार हवालदार आहे, याशिवाय खानच्या घराबाहेर दोन पोलिस हवालदारही तैनात आहेत. वाय प्लस  सुरक्षेमध्ये पुरविलेल्या पोलिस सुरक्षेत चार सशस्त्र सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी सलमान खानने कोणतीही तक्रार दिलेली नाही, मात्र पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
याआधीही मार्च २०२३ मध्ये सलमान खानच्या स्वीय सहाय्यकाला धमकीचा ईमेल आला होता, या प्रकरणी पोलिसांनी बांद्रा पोलिस ठाण्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा सहकारी गोल्डी ब्रार यांच्याविरुद्ध खानला धमकी दिल्याप्रकरण गुन्हा नोंदवला होता.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=GKtOPyJfRJg

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.