Salman Khan House Firing : हल्लेखोरांनी सलमानच्या फार्म हाऊसजवळ घेतले होते भाड्याने घर

149
Salman Khan Firing Case : पंजाबमधून अटक करण्यात आलेल्या दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’वर (Galaxy Apartment) रविवारी (१४ एप्रिलला) पहाटे झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. खान यांच्या निवासस्थानावर गोळीबार करणारे हल्लेखोर यांची संपूर्ण माहिती मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) हाती लागली आहे. यात एक धक्कादायक माहिती म्हणजे हल्लेखोरांनी महिण्याभरापूर्वी पनवेल मध्ये भाड्याने घेतलेले घर हे सलमान खानच्या (Salman Khan) पनवेल (Panvel) फार्महाऊसपासून केवळ १२ किलोमीटर अंतरावर होते, दरम्यान गुन्हे शाखेने घर मालक, एजंट आणि मोटारसायकल विकणाऱ्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र सलमानच्या फार्महाऊसजवळ घर घेण्यामागे हल्लेखोरांचे काय कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Salman Khan House Firing)
अनमोल बिष्णोईने घेतली जबाबदारी
गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांना मुंबई पोलीस (Mumbai Police) जंगजंग पछाडत आहेत. गोळीबाराच्या घटनेच्या २४ तासात मुंबई गुन्हे शाखेच्या या हल्लेखोरांची जवळपास संपूर्ण माहिती हाती लागली आहे. या हल्ल्याची जबाबदारी पंजाबचा गँगस्टर व सध्या तिहार तुरुंगात असलेला लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) याचा भाऊ अनमोल बिष्णोई (Anmol Bishnoi) याने घेतली आहे. त्याने फेसबुकवर पोस्ट टाकून या हल्ल्याची जवाबदारी स्वीकारली असली, तरी जोपर्यंत हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागत नाही, तोपर्यंत हल्ला कोणी घडवून आणला याबाबत नक्की सांगता येणार नसल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. (Salman Khan House Firing)
सलमान खान (Salman Khan) च्या बंगल्यावर हल्ला करणारे हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल ही त्यांनी पनवेल येथून एका व्यक्तीकडून विकत घेतली होती, ही माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेऊन पनवेल (Panvel) येथून मोटरसायकल मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या चौकशीत त्याने ही मोटरसायकल पनवेलजवळ असणाऱ्या हरिग्राम (Harigram) येथे भाडेतत्वावर राहणाऱ्या दोन तरुणांना विकली होती, पोलिसांनी घर भाड्याने मिळवून देणारा एजंट आणि घरमालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोघांनी एक महिन्यापूर्वी हे घर भाड्याने घेतले होते. (Salman Khan House Firing)
हल्लेखोरांनी घेतलेले हरिग्राममधील घर सलमान खानच्या पनवेल (Panvel) येथील फार्म हाऊसपासून केवळ १२ किलोमीटर दूरवर आहे. या दोघांनी फार्म हाऊसची देखील मोटरसायकल वरून रेकी केली होती का? फार्म हाऊसपासून जवळ घर घेण्यामागे या हल्लेखोरांचा काय मनसुबा होता, याचा तपास सुरू आहे. (Salman Khan House Firing)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.