-
प्रतिनिधी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील चार महिन्यांत केलेल्या कारवाईची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. राज्यातील महसूल विभाग हा लाचखोरीत एक क्रमांकावर असून पोलीस विभाग हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. नाशिक जिल्हा भ्रष्टाचारात सर्वांत पुढे असून पुणे जिल्हा दोन क्रमांकावर आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते १६ एप्रिल २०२५ या साडेतीन महिन्यात लाचलुचपत प्रकरणात २२७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (Bribery)
(हेही वाचा – समय रैनाच्या अडचणी पुन्हा वाढल्या; अपंगत्वावर केलेल्या टिप्पणीमुळे Supreme Court संतापले; म्हणाले…)
महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील साडेतीन महिण्यात केलेल्या कारवाईची आकडेवारी जाहीर केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते १६ एप्रिल २०२५ दरम्यान राज्यभरात २२७ लाचखोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात एकूण ३२८ आरोपीची संख्या असून सर्वाधिक गुन्हे नाशिक जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात ४८ गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ६६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर पुणे जिल्हा असून पुणे जिल्ह्यात ६२ जणांविरुद्ध ४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (Bribery)
(हेही वाचा – नेटकऱ्यांनी Sanjay Raut यांची लाज का काढली?)
तिसऱ्या क्रमांकावर छत्रपती संभाजी महाराज नगर (औरंगाबाद) असून या जिल्ह्यात लाच प्रकरणी ३३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात ४४ आरोपीचा समावेश आहे. चौथ्या क्रमांकावर नागपूर जिल्हा असून नागपूर जिल्ह्यात ४४ जणांवर २९ भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाचव्या क्रमांकावर ठाणे जिल्हा असून मुंबईत भ्रष्टाचाराचे सर्वात कमी गुन्हे दाखल झाले आहे. भ्रष्टाचारात राज्याच्या महसूल विभागाने अव्वल क्रमांक पटकावला असून पोलीस विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. महसूल विभागात सर्वाधिक ६६ गुन्हे दाखल झाले असून पोलीस खात्यात ३३ गुन्हे दाखल झाले आहे. तिसऱ्या क्रमांकवर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असून चौथ्या क्रमांकावर महानगरपालिका आहे. (Bribery)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community