Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात गुजरात राज्यातून मुख्य आरोपीला अटक

राजवीर हा उच्च शिक्षित असून सायबर तज्ञ असल्याची माहिती त्याने गंमत म्हणून धमकीचे ईमेल अंबानी यांना पाठवले होते असे अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आले.

127
Mukesh Dhirubhai Ambani: 'हे' आहेत आशियातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती
Mukesh Dhirubhai Ambani: 'हे' आहेत आशियातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती

उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता पथकाने मुख्य आरोपीला गुजरातच्या गांधी नगर येथून अटक केली आहे. राजवीर जगतसिंह खंत (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजवीर हा उच्च शिक्षित असून सायबर तज्ञ असल्याची माहिती त्याने गंमत म्हणून धमकीचे ई-मेल अंबानी यांना पाठवले होते असे अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आले. दरम्यान गावदेवी पोलिसांनी तेलंगणा येथून गणेश वनपारधी (१९) याला अटक केली आहे, गणेश याने अंबानी यांना स्वतःच्या मेल आयडीवरून धमकीचा मेल पाठवला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. (Mukesh Ambani)

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष उद्योगपती मुकेश अंबानी यांना २७ ऑक्टोबर रोजी पहिला धमकीचा मेल आला होता. त्यात प्रथम २० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. “जर तुम्ही (अंबानी) आम्हाला २० कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतात सर्वोत्तम नेमबाज आहेत.” असा धमकीचा मेल पाठविण्यात आला होता. एकाच ई-मेल आयडीवरून शनिवारी संध्याकाळी दुसरा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला, ज्यामध्ये २०० कोटींची मागणी करण्यात आली आणि त्यात असे लिहण्यात आले की, “तुम्ही आमच्या ईमेलला प्रतिसाद दिला नाही, आता तुम्ही आम्हाला २०० कोटी रुपये द्याल. जर तुम्ही पैसे दिले नाहीत, तर तुमच्या मृत्यूच्या वॉरंटवर स्वाक्षरी केली जाईल. शुक्रवारी रात्री ९ वाजता मुकेश अंबानी यांच्या कार्यकारी सहाय्यकाने याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या दोन ईमेल पाठोपाठ सोमवारी खंडणीखोराने अंबानींच्या अधिकृत ई-मेल आयडीवर तिसरा ईमेल पाठवून ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना मंगळवार आणि बुधवारी असे आणखी दोन ई-मेल असे एकूण चार धमकीचे मेल पाठविण्यात आले होते. (Mukesh Ambani)

(हेही वाचा – Toll Plazas In Mumbai : मुंबईतील टोल प्लाझाच्या ठिकाणी स्वच्छता राखा; महापालिकेचे एमएसआरडीसीला निर्देश)

गावदेवी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे गुप्तवार्ता पथक करीत होते. दरम्यान गावदेवी पोलिसांच्या तपासात तेलंगणा येथे राहणारा गणेश वनपारधी याचा ई-मेल आयडी मिळून आला. या ई-मेल आयडीच्या माहितीवरून गावदेवी पोलिसांनी त्याला तेलंगणा येथून अटक केली. या गुन्ह्याचा समांतर तपास करणाऱ्या गुप्तवार्ता पथकाने शादाब खान या ईमेल आयडी वरून धमकीचा मेल पाठवाऱ्याचा शोध घेतला असता तो मेल आयडी गुजरात राज्यातील गांधीनगर येथे राहणार राजवीर खंत हा करीत असल्याचे समोर आले. गुप्तवार्ता पथकाने तत्काळ एक पथक गुजरात राज्यात पाठवून राजवीर खंत याला ताब्यात घेऊन त्याला अटक करून मुंबईत आणण्यात आले. अंबानी यांना धमकीचे मेल करणारा मुख्य आरोपी राजवीर असल्याची माहिती समोर आली. त्याने एका कंपनीचा ‘व्हीपीएन’ ऍड्रेस चोरी करून शादाब खान नावाने ई-मेल आयडी तयार करून त्याने मुकेश अंबानी यांना धमकीचे मेल पाठवत होता. या ई-मेलचा आयपी ऍड्रेस बेल्जीयमचा येथील दाखवत असल्यामुळे राजवीर याला शोधणे कठीण झाले होते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. राजवीर याचे शिक्षण टीवाय बीकॉम पर्यंत झालेले आहे व तो सायबर तज्ज्ञ असल्यामुळे या सर्व गोष्टी त्याला करता आल्या. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांना धमकीचे ई-मेल पाठविण्यामागे राजवीर याचा काहीही हेतू नव्हता, केवळ गंमत म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. (Mukesh Ambani)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.