Pune Porsche Car Accident प्रकरणात आता दहा पथके तयार, ‘असा’ करणार तपास

131
Pune Porsche Car Accident प्रकरणात आता दहा पथके तयार, 'असा' करणार तपास
Pune Porsche Car Accident प्रकरणात आता दहा पथके तयार, 'असा' करणार तपास

कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघातानंतर (Pune Porsche Car Accident ) आरोपी अल्पवयीन मुलास निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली होती. मात्र, नंतर समाजात आणि माध्यमांमध्ये यावरुन चौफेर टीका झाली. अखेर या प्रकरणात पुणे पोलिसांना भूमिका बदलत आक्रमक तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या प्रकरणात पुणे पोलिसांची दहा पथके तपास करणार आहेत. पोलिसांनी या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) याला अटक केली आहे. (Pune Porsche Car Accident )

10 पथकांकडून पुण्यातील अपघाताचा तपास होणार

कल्याणी नगर अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी 10 पथके तयार केली आहेत. एकूण 10 पथकांकडून पुण्यातील अपघाताचा तपास होणार आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडून पथकातील पोलीस अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलवली आहे. तपासाबाबत सर्व पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पथकाला त्यांची जबाबदारी आणि काम ठरवून देण्यात आले आहेत. (Pune Porsche Car Accident )

सीसीटीव्ही तपासून तपास केला जाणार

पुणे पोलिसांनी या गुन्ह्यात नव्याने कलम ६५ (ई) आणि कलम १८ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम या दोन कलमाचा समावेश आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पुणे पोलीस न्यायालयात करणार आहेत. पुणे पोलीस या प्रकरणांचे मुळ असणाऱ्या पबकडे लक्ष केंद्रीत करणार आहे. अपघातात वापरण्यात आलेली ती महागडी गाडी सुरेंद्र अगरवाल (Surendra Agarwal) यांच्या कंपनीच्या मालकीची आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी येरवडा पोलीस ठाण्याच सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही तपासून तपास केला जाणार आहे. (Pune Porsche Car Accident )

धनिकपुत्राचे पिझ्झा-बर्गरचे चोचले बंद

या धनिकपुत्राचे सगळे लाड बंद करत त्याला घरचे जेवण देण्यास मनाई करण्यात आली आहे. बालसुधारगृहात पहिल्या दिवशी या धनिकपुत्राला सकाळच्या नाश्त्याला पोहे, दूध आणि अंडी देण्यात आली. त्यानंतर त्याला प्रार्थनेसाठी नेण्यात आले. प्रार्थना संपल्यानंतर या मुलाचे समुपदेशन करण्यात आले. तर दुपारी आणि रात्रीच्या जेवणातही धनिकपुत्राला चपाती आणि भाजी असे साधे जेवणच देण्यात आले. (Pune Porsche Car Accident )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.