Pune Police : कोयता हल्ला प्रकरण पोलिसांना भोवले; आणखी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 7 जणांचे निलंबन

132

दर्शना पवार हत्या प्रकरण आणि सदाशिव पेठेतील कोयता हल्ला प्रकरणानंतर पुणे पोलीस चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहे. पुण्यात आणखी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सात जणांचे निलंबन करण्यात आले आहे. पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या निलंबनानंतर आता वारजे पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांचे निलंबन करण्यात आले आहे.

कामामध्ये हलगर्जीपणा करणार्‍या तसेच कर्तव्य न पार पाडणार्‍या पोलीस अधिकाऱ्यांना पुणे पोलीस आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु सायप्पा हाके, पोलीस निरीक्षक दत्ताराम गोपीनाथ बागवे, पोलीस उपनिरीक्षक मनोज रामदास बागल, पोलीस उपनिरीक्षक यशवंत भिमशा पडवळे, पोलीस उपनिरीक्षक जर्नादन नारायण होळकर, पोलीस नाईक अमोल विश्वास भिसे आणि पोलीस नाईक सचिन संभाजी कुदळे यांचे निलंबन करण्यात आले आहे. योग्यरित्या मोक्का कारवाई केली नाही, परिसरातील दारुची दुकाने बंद केली नाहीत, अनेक प्रकरणांमध्ये कारवाई करण्यास टाळाटाळ करणे, आरोपींविरोधात कारवाई करण्यात हलगर्जीपणा दाखवल्यामुळे या सगळ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.

(हेही वाचा Hindu Janakrosh Morcha : मालेगावात हिंदूंचा आक्रोश; धर्मांतर, लव्ह जिहादच्या विरोधात हिंदू उतरले रस्त्यावर )

यापूर्वी पुण्यातील सहकार नगर तोडफोड प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे आणि पाच कर्मचाऱ्यांना निलंबन करण्यात आले होते. यापूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्यानंतर सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलीस आयुक्तांनी पुण्यातील सहकार नगर तोडफोड प्रकरणी निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईनंतर पोलिसांनी बाकी सगळ्या पोलिसांची चौकशी केली त्यानंतर आणखी सात जणांवर कारवाई केली आहे. यापूर्वी सावळाराम साळगावकर, मनोज एकनाथ शेंडगे, समीर विठ्ठल शेंडे, हसन मकबुल मुलाणी, मारुती गोविंद वाघमारे, संदीप जयराम पोटकुले आणि विनायक दत्तात्रय जांभळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.