Hindu Janakrosh Morcha : मालेगावात हिंदूंचा आक्रोश; धर्मांतर, लव्ह जिहादच्या विरोधात हिंदू उतरले रस्त्यावर 

148

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात लव्ह जिहाद आणि धर्मांतराची प्रकरणे वाढलेली आहेत, विशेष म्हणजे मालेगावात या प्रकरणाची संख्या जास्त आहे. त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार, २ जुलै रोजी मालेगाव येथे  हिंदू जन आक्रोश मोच्याचे आयोजन करण्यात आले. त्याचे नेतृत्व भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले.

नुकतेच मालेगाव येथे गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला झाला, त्याचे संतप्त पडसाद मालेगावात उमटले. हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे हिंदूंनी आज मालेगावात जन आक्रोश मोच्याचे आयोजन केले. गोरक्षांवर होणारे हल्ले थांबवण्यात यावेत, त्यांना सुरक्षा द्यावी, धर्मांतर विरोधी कायदा करावा आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले.

(हेही वाचा हा पप्पू तुम्हाला चॅलेंज देतोय, या अंगावर; आदित्य ठाकरेंचे शिंदे आणि भाजपाला आव्हान)

मुसलमानांच्या मोर्चाला परवानगी नाकारली

याच वेळी मालेगावात मुसलमानांनीही मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागितली. मात्र त्यांना प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. तरीही मुसलमानांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.