Pune Crime News: भांडणाचा राग धरुन अल्पवयीन कार चालकाकडून महिलेस चिरडण्याचा प्रयत्न

208
Pune Crime News: भांडणाचा राग धरुन अल्पवयीन कार चालकाकडून महिलेस चिरडण्याचा प्रयत्न
Pune Crime News: भांडणाचा राग धरुन अल्पवयीन कार चालकाकडून महिलेस चिरडण्याचा प्रयत्न

पुण्यातील पोर्शे कार अपघाताची घटना (Pune Crime News) ताजी असतानाच आळंदीत एका अल्पवयीन मुलाने धक्कादायक प्रकार केला आहे. जुन्या भांडणाचा राग धरुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रकार त्या मुलाने केला आहे. आळंदी जवळील असणाऱ्या वडगाव घेणंद येथील व्हिडिओ समोर आला आहे. जुन्या भांडणाचा रागामुळे एका अल्पवयीन कार चालकाने महिलेसह नागरिकांना भरधाव कारने चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे त्या व्हिडिओत दिसत आहे. (Pune Crime News)

घटनेचा थरार कॅमेरात कैद

हा अल्पवयीन कार चालक त्या महिलेस चिरडण्यासाठी आधी कार पाठीमागे (रिव्हर्स) घेऊन जातो. त्यानंतर भरधाव वेगाने चालवत काही नागरिकांना आणि त्या महिलेस चिरडण्याचा प्रयत्न करतो. या घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला आहे. अल्पवयीन मुलाने हा अपघाताचा थरार केल्यानंतर तो थांबला नाही. त्यानंतर तो कारच्या छतावर बसून शिवीगाळ करताना दिसत आहे. (Pune Crime News)

अल्पवयीन मुले अन् त्यांच्या पालकांविरोधात कारवाई करण्याची गरज

पूर्वीच्या भांडणाचा राग धरुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रकार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी आळंदी पोलिसांत नाजुका थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलाच्या हातात कार देणाऱ्या पालकावर अजून काहीच कारवाई झाली नाही. पुणे आणि परिसरात बड्या व्यक्तींच्या अल्पवयीन मुलाना गाड्या देणे नागरिकांच्या जीवावर उठले आहे. पोर्श प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुले अन् त्यांच्या पालकांविरोधात कारवाई करण्याची गरज आहे. (Pune Crime News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.