Pune Crime : एकतर्फी प्रेमातून पुन्हा एमपीएससी विद्यार्थिनीवर हल्ला; हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी

हल्ल्यात जखमी झालेली तरुणी जीव मुठीत घेऊन सदाशिव पेठेत पळत सुटली.

136
Pune Crime : एकतर्फी प्रेमातून पुन्हा एमपीएससी विद्यार्थिनीवर हल्ला; हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी

दर्शना पवार हत्याकांड नंतर पुण्यात पुन्हा एकदा एकतर्फी प्रेमातून एमपीएससीच्या विद्यार्थिनीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातील मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठ या ठिकाणी एकतर्फी प्रेमाच्या वादातून एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीवर भरदिवसा कोयत्याने वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र वेळीच दोन तरुणांनी हल्लेखोर तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने मुलीचा जीव वाचला आहे. याप्रकरणी पेरुगेट पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

(हेही वाचा – World Cup 2023 : ठरलं तर मग! भारत – पाकिस्तान सामना अहमदाबादमध्ये खेळला जाणार)

ज्यावेळी तरुणानं त्याच्या मैत्रिणीवर कोयत्यानं हल्ला केला, त्यावेळी तिच्यासोबत त्यांचा आणखी एक मित्रही होता. तरुणानं तिच्यावर कोयत्यानं हल्ला केला. त्यावेळी हल्ल्यात जखमी झालेली तरुणी जीव मुठीत घेऊन सदाशिव पेठेत पळत सुटली. तिचा मित्र कोयता घेऊन तिच्या मागे पळत होता. ती उपस्थितांकडे मदतीसाठी याचनाही करत होती. पण तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही.

काही काळानं एक तरुण तिच्या मदतीसाठी धावून आला. कोयता हातात असलेला तरुण तरुणीच्या डोक्यावर प्रहार करणार एवढ्यात मदतीसाठी धावून आलेल्या तरुणानं कोयता धरला आणि हल्लेखोर तरुणाला रोखलं. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला. उपस्थितांनी घडलेल्या धक्कादायक प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जखमी तरुणी आणि आरोपी शंतनू जाधव हे दोघे मित्र होते. मात्र काही कारणास्तव तरुणीने आरोपीचा फोन नंबर ब्लॉक केला आणि ती त्याच्यासोबत बोलणं टाळत होती. या रागातून आरोपी शंतनू जाधव याने तिच्यावर जीव घेणा हल्ला केला.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.