Nashik Police : पोलीस मित्र निघाला अट्टल गुन्हेगार; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Nashik Police : पोलीस मित्र निघाला अट्टल गुन्हेगार; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

218
Nashik Police : पोलीस मित्र निघाला अट्टल गुन्हेगार; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
Nashik Police : पोलीस मित्र निघाला अट्टल गुन्हेगार; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

नाशिक युनिट -1 च्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतलेल्या पोलीस मित्र म्हणून वावरणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराकडून नाशिक रोड (Nashik Police) पोलिसाच्या गुन्हे शोध पथकाने 7 गुन्हे उडकीस करून सुमारे साडेसोळा लाखाचे 28 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत, तर दुसऱ्या गुन्हेगाराकडून 10 लाख किमतीच्या 74 खताच्या गोण्यांची चोरी व चोरीसाठी वापरलेले वाहन उघडकीस आणल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.

(हेही वाचा – Maharashtra Government चा अजब शासन निर्णय; महाविद्यालयांनी मतदार नोंदणी करावी, विद्यार्थ्यांना मतदान करण्याची शपथ द्यावी)

पोलीस आयुक्तालयातील (Police Commissionerate) परीमंडळ २ मध्ये गुन्हे घडकीस येण्याचे प्रमाण वाढले असून गुन्हेगारांमध्ये याचा जबर बसला आहे. याबाबत अधिक माहिती देतांना उपायुक्त राऊत म्हणाल्या की, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शोध पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांनी युनिट एककडून ताब्यात घेतलेला विशाल उर्फ पप्पु प्रकाश गांगुर्डे (वय 38 वर्षे) (Police Mitra) राहणार कैलाजी सोसायटी, जेलरोड नाशिक रोड याचा शिताफीने तपास केला.

उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील, तर नाशिक रोड येथील सहा चोऱ्या, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील साडे सोळा लाख किंमतीचे 28 तोळे 6 ग्राम सोन्याचे दागिने हस्तगत केले. हे चोरलेले सोने विकत घेणाऱ्या प्रशांत विष्णुपंत नागरे, हर्षल चंद्रकांत म्हसे व चेतन मधुकर चव्हाण या सराफांना गुन्हात ताब्यात घेतले आहे. (Nashik Police)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.