Crime : घरी ‘ईद’ साजरी करण्यासाठी गँगस्टर बचकानाची तुरुंगातून धडपड

इलियास बचकाना हा तुरुंगात बसून देखील आपली टोळी चालवत आहे, त्याला भेटण्यासाठी येणाऱ्याकडे निरोप पाठवून तो आपल्या गुंडामार्फत खंडणी वसुली करीत असल्याचे समोर आले आले आहे.

115
Crime : घरी 'ईद' साजरी करण्यासाठी गँगस्टर बचकानाची तुरुंगातून धडपड

‘मोक्का’ अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात असलेला कुख्यात गँगस्टर इलियास बचकानाला (Ilyas Bachkana) ‘रमजान ईद’ कुटुंबासोबत साजरी करण्यासाठी त्याची जामीन मिळविण्याची धडपड सुरू आहे. बचकाना टोळीच्या दोन गुंडांनी भायखळा येथे राहणाऱ्या एका सिव्हिल कंत्राटदाराला शस्त्राचा धाक दाखवून बचकानाला जामीनावर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न कर आणि त्याच्या घरी पैसे पाठव नाही तर जीवाला मूकशील अशी धमकी दिली आहे. या प्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime)

कुख्यात गुंड इलियास बचकाना (Ilyas Bachkana) हा भायखळा परिसरात राहणारा असून तो स्वतःची एक गॅंग चालवतो. मुंबईसह राज्यात तसेच परराज्यात त्याच्यावर ३० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात खंडणी, अपहरण, दरोडा, जबरी चोरी, खून आणि खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील एका दरोड्याच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा देखील झालेली आहे. पॅरोलवर बाहेर पडल्यावर त्याने पुन्हा भायखळा येथे एका कंत्राटदाराचे अपहरण करून सुटकेसाठी खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने बचकाना आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करून त्याची तळोजा तुरुंगात रवानगी करण्यात आलेली आहे. (Crime)

(हेही वाचा – Pakistan Cricket : पाक क्रिकेटमध्ये पुन्हा अभूतपूर्व गोंधळ, ६ दिवसांत ४ मोठ्या घडामोडी)

दोन गुंडांना धमकी देण्यासाठी पाठवले 

इलियास बचकाना (Ilyas Bachkana) हा तुरुंगात बसून देखील आपली टोळी चालवत आहे, त्याला भेटण्यासाठी येणाऱ्याकडे निरोप पाठवून तो आपल्या गुंडामार्फत खंडणी वसुली करीत असल्याचे समोर आले आले आहे. रमजान ईद जवळ आल्यामुळे बचकाना याला ईद साजरी करण्यासाठी घरी यायचे असल्यामुळे त्याची जामीन मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यासाठी त्याला पैशांची गरज असून त्याने आपल्या दोन गुंडांना माझगाव येथे राहणाऱ्या एका सिव्हिल कंत्राटदाराला धमकी देण्यासाठी पाठवले होते. (Crime)

अमजद खान आणि रियाज शहा या दोघांनी गेल्या आठवड्यात या कंत्राटदाराला त्याच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये गाठून त्याला तलवारीचा धाक दाखवून ‘रमजान महिना सुरू है, बचकाना के घर पे पैसा भेज, और उसको बेल (जामीन) पे छुडाने के लिए कुछ कर, तुने पैसा नही भेजा तो, तेरे घरपे ‘तेरी गर्दन लेके जाऊंगा, अशी धमकी कंत्राटदाराला या दोन गुंडांनी दिली. घाबरलेल्या कंत्राटदाराने भायखळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी अहमद आणि शाह यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (२) (गुन्हेगारी धमकी) आणि ३४ (सामान्य हेतू) आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.