Pakistan Cricket : पाक क्रिकेटमध्ये पुन्हा अभूतपूर्व गोंधळ, ६ दिवसांत ४ मोठ्या घडामोडी

Pakistan Cricket : ४ पराभवानंतर पीसीबीने शाहीन आफ्रिदीची कर्णधारपदावरून उचलबांगडी केली आहे. 

118
Pakistan Cricket : पाक क्रिकेटमध्ये पुन्हा अभूतपूर्व गोंधळ, ६ दिवसांत ४ मोठ्या घडामोडी
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुन्हा एकदा बाबर आझमकडे कर्णधारपद सोपवले आहे. बाबर टी२० आणि वनडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व करेल. निवड समितीच्या शिफारशीनंतर पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी हा निर्णय घेतला आहे. तर शान मसूद पाकिस्तानच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. (Pakistan Cricket)

शान मसूद आणि शाहीन शाह आफ्रिदीला कर्णधारपद सोपवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला, पाकिस्तानमध्ये झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये ३-० अशी मात दिली होती, तर शाहीनच्या कॅप्टन्सीखाली न्यूझीलंडने पाकिस्तानला टी २० सिरीजमध्ये ४-१ च्या फरकाने हरवले होते. पाकिस्तानच्या या कामगिरीवरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे आज टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करण्याची पुन्हा संधी बाबर आझमला देण्यात आली. (Pakistan Cricket)

(हेही वाचा – NCP: राष्ट्रवादीने डावलले, वंचितने सावरले)

गेल्या दिवसांपासून पाकिस्तानच्या संघात कर्णधारपदावरून बराच गदारोळ पाहायला मिळाला. एका आठवड्यात पाकिस्तान क्रिकेटमध्ये ४ मोठ्या घडामोडी घडल्या. यामधील पहिली घडामोड म्हणजे इमाद वासीमने आपली निवृत्ती मागे घेतली. स्पॉट-फिक्सिंगचा दोषी असलेला पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र आता तो पुन्हा एकदा मैदानात परतणार आहे. मोहम्मद अमीरनेही आपली निवृत्ती मागे घेतली आहे. तिसरी घडामोड म्हणजे शआहीन अफ्रिदीला टी-२० संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आले आणि चौथी घडामोड म्हणजे पाकिस्तानने पुन्हा बाबर आझमची कर्णधारपदी नियुक्ती केली. त्यामुळे हे सर्व पाहता पाकिस्तान क्रिकेट बोर्डात सावळा गोंधळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. (Pakistan Cricket)

अलीकडेच, एकदिवसीय विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर बाबर आझमच्या जागी शाहीन आफ्रिदीला कर्णधार बनवण्यात आले. टी-२० विश्वचषकात शाहीन आफ्रिदी पाकिस्तानी संघाचे नेतृत्व करेल, असे मानले जात होते, मात्र अवघ्या ५ सामन्यांनंतर शाहीन आफ्रिदीला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्यामुळे आता टी-२० विश्वचषकात शाहीन आफ्रिदीच्या जागी बाबर आझम कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे की, शाहीन आफ्रिदीसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे, केवळ ५ सामन्यांनंतर पीसीबीने कर्णधारपद काढून घेतले. (Pakistan Cricket)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.