NIA Raid : पीएफआय संबंधित एनआयए ची मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी छापेमारी, ७ जणांना घेतले ताब्यात 

एनआयएच्या पथकाने भिवंडी, मुंब्रा आणि महाराष्ट्रातील इतर विविध जिल्ह्यांमध्ये सर्च ऑपरेशन हाती घेतले

168
NIA : इसिसच्या ६ दहशतवाद्यांविरोधात ४०० पानांचे आरोपपत्र एनआयए कडून दाखल
NIA : इसिसच्या ६ दहशतवाद्यांविरोधात ४०० पानांचे आरोपपत्र एनआयए कडून दाखल
राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संबंधित मुंबईतील विक्रोळी, नवीमुंबई, मुंब्रासह राज्यातील काही ठिकाणी बुधवारी पहाटे छापे (NIA Raid) टाकण्यात आले आहे. या छापेमारीत ७/११ बॉम्बस्फोटातून निर्दोष मुक्तता झालेल्या अब्दुल वाहिद शेख च्या निवासस्थानाचा समावेश आहे. दरम्यान एनआयए ने या प्रकरणी ७ ते ८ जणांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७/११ बॉम्बस्फोटातून निर्दोष मुक्तता झालेला अब्दुल वाहिद हा विक्रोळी पूर्व येथे राहण्यास असून  तो ‘इनोसंट नेटवर्क’ ही संस्था चालवत असून त्याचा पीएफआयशी संबंध असल्याचा संशय आहे. एनआयएने पीएफआय मॉड्यूल नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र, यूपी, राजस्थान आणि एनसीआरसह विविध राज्यांमध्ये अनेक ठिकाणी शोध देखील घेतला. एनआयएने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंदाजे पाच ठिकाणी छापे (NIA Raid) टाकले.

(हेही वाचा-Nitesh Rane : नवरात्रोत्सवात गरबा खेळायला येणारे हिंदू हवेत, नितेश राणे यांची मागणी

अब्दुल वाहिद शेखच्या विक्रोळीतील निवासस्थानाव्यतिरिक्त, एनआयएच्या पथकाने भिवंडी, मुंब्रा आणि महाराष्ट्रातील इतर विविध जिल्ह्यांमध्ये सर्च ऑपरेशन हाती घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक नोंदणीकृत संस्था आणि संस्था चालक नवीन नावाने पीएफआय (PFI ) पुन्हा स्थापन करून आणि संशयास्पद क्रियाकलप आणि निधी उभारणीच्या कामात गुंतल्याचा संशय आहे.

या संशयास्पद कारवाया आणि पीएफआय(PFI ) साठी निधी उभारणीच्या क्रियाकलापांमध्ये त्यांचा सहभाग असल्याच्या संशयामुळे एनआयए ( NIA)  ने वेगवेगळ्या ठिकाणांहून ७ ते ८ व्यक्तींना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=VkanL2nGgyk

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.