New Year Celebration : मुंबईत २२९ तळीरामांवर कारवाई

मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी ९ हजार २५ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, ३ हजार वाहन चालकांवर विविध मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

157
New Year Celebration : मुंबईत २२९ तळीरामांवर कारवाई
New Year Celebration : मुंबईत २२९ तळीरामांवर कारवाई

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) राबविण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या २२९ मद्यपी वाहन चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्हची (Drunk and Drive) कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई शहरासह उपनगरात करण्यात आली आहे. मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी ९ हजार २५ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, ३ हजार वाहन चालकांवर विविध मोटार वाहन कायदा (Motor Vehicle Act) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (New Year Celebration)

र्दीच्या ठिकाणी पोलिसांचे लक्ष

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील चौपाट्या, प्रेक्षणीय स्थळ, गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India), नरिमन पॉईंट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र आले होते, मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या नागरिककांच्या सुरक्षेसाठी तसेच सेलिब्रेशनवर विघ्न येऊ नये म्हणून हजारोच्या संख्येने मुंबई पोलिस (Mumbai Police) बंदोबस्त कामी रस्त्यावर उतरले होते. मुंबईत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून दक्षता घेण्यात येत होती, शहरात जागोजागी नाकाबंदी लावण्यात आली होती, तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचे लक्ष होते. (New Year Celebration)

(हेही वाचा – अपघात घडल्यास अपघातग्रस्ताला मदत न करणाऱ्या Track Driver ला १० लाखांचा दंड; ट्रक चालकांचे आंदोलन)

मुंबई पोलिसांकडून मुंबईतील इतक्या ठिकाणची तपासणी

मुंबई तसेच वाहतूक विभागाच्या पोलिसांकडून मुंबईसह उपनगरात एकूण ११२ ठिकाणी नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी करण्यात आली, या तपासणी दरम्यान विनाहेल्मेट दुचाकी चालवणारे, मद्य प्राशन करून वाहन चालवणारे, बेदरकारपणे वाहन चालविणारे असे जवळपास ३ हजार जणांवर मोटार वाहन कायदा (Motor Vehicle Act) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, त्यात मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या २२९ जणांविरुद्ध ड्रंक अँड ड्राईव्ह (Drunk and Drive) ची कारवाई करण्यात आली असून २४१०, विनाहेल्मेट, ३२० विरुद्ध दिशेने बेदकारपणे वाहन चालविणाऱ्यांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) मुंबईतील ६१८ ठिकाणची तपासणी करण्यात आली आहे. (New Year Celebration)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.