NCB Raid : एनसीबीकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; ९ जणांना अटक

53
NCB Raid : एनसीबीकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; ९ जणांना अटक

महाराष्ट्र राज्य हे अमली पदार्थाचे (ड्रग्ज) (drug’s hub) हब बनत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई,नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या शहरातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचे उत्पादन आणि विक्री केली जात आहे. एमडी( MD), अल्प्राझोलम (alprazolam) या सारख्या नशेची औषधं तयार करण्याचे कारखाने राज्यातील काही जिल्ह्यामध्ये चोरीछुपे सुरू असून महाराष्ट्राचा उडता पंजाब करण्याचा प्रयत्न समाजकंटकाकडून सुरू आहे.

मुंबई पोलीसांच्या पाठोपाठ केंद्रीय नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB Raid) मुंबई विभागाने मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर रॅकेटसह (international drugs Human Trafficking) पुणे जिल्ह्यात सुरू असलेले अमली पदार्थांचे दोन कारखाने उध्वस्त केले. या कारवाईत एनसीबीने १२५ कोटी रुपयांच्या अमली पदार्थसह ९ जणांना अटक केली आहे.

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ प्रतिबंधक विभाग आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB Raid) या केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रातील ठाणे, पालघर जिल्ह्यातील निर्जन ठिकाणी असलेले एमडी (मेफेड्रोन) तयार करण्याचे कारखाने उध्वस्त करून अनेकांना अटक करण्यात आली होती. मुंबईतील सकिनाका पोलिसांनी नाशिक येथे नुकतीच एमडी बनविण्याच्या कारखान्यावर छापा टाकून जवळपास ३०० कोटी रुपयांच्या एमडी या अमली पदार्थासह १२ जणांना अटक करण्यात आली होती. नाशिक येथील एमडी तयार करण्याचा कारखाना हा ड्रग्स माफिया ललित पाटील याच्या संबंधित असल्याचे समोर आले आहे.

कोकेन (NCB Raid) या महागड्या अमली पदार्थाची एक मोठी डिलिव्हरी नुकतीच खारघर येथे राहणाऱ्या नायजेरियन नागरिक पॉल इकेना उर्फ बॉसमन paul ikena @ bossman) नावाच्या व्यक्तीला मिळाल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली होती, तसेच पॉल इकेना उर्फ बॉसमन दीर्घकाळापासून अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतल्याचे उघड झाले.

(हेही वाचा – Mumbai Metro : आता गरबा खेळा अगदी निश्चिंत; नवरात्रीमध्ये मुंबई मेट्रोने दिली ‘ही’ सुविधा)

त्यानुसार, पॉलवर योग्य पाळत ठेवून त्याला अटक करण्यात आली. दरम्यान एनसीबीने (NCB Raid) त्याच्याकडून जवळपास दोन किलो कोकेन जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान गुजरात मधील सुरत येथील दोन व्यक्ती पॉल इकेना यांच्याकडून विक्रीसाठी अमली पदार्थ खरेदी करीत असल्याचे तपासात समोर आले. या माहितीच्या आधारे एनसीबीने साकीर आणि सुफियान नावाच्या दोघांना अटक केली. या तपासा दरम्यान, एका बँक व्यवस्थापकाला देखील अटक करण्यात आली आहे.

पॉल इकेन्ना उर्फ बॉसमन सन १९८८ काळापासून अंमली पदार्थांच्या व्यवसायात असून त्याला १९८९मध्ये एनसीबीच्या (NCB Raid) ४ किलो हेरॉईनसह अटक करण्यात आली होती.

त्यानंतर त्याला २००१ मध्ये ११ किलो हेरॉईन प्रकरणात अटक करण्यात आली होती (या प्रकरणात तो दोषी ठरला होता). एनसीबीने (NCB Raid) दुसऱ्या कारवाईत एव्हलिना अल्वारेझ नावाच्या महिलेला १२ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली, ही महिला एतिहाद एअरलाइन्सद्वारे दुबई मार्गे साओ पाओलो येथून मुंबईला आली होती, एव्हलिना हिने राहण्यासाठी बुक केलेल्या मुंबईतील एका हॉटेलच्या खोलीतून बोलिव्हियन नागरिक ग्लोरिया इलोर्का सी नावाच्या आणखी एका महिलेला अटक करण्यात आली. त्यांच्या सामानाची झडती घेतली असता, इव्हलिनाच्या सामानातून २ किलो १८० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले, तर ग्लोरियाच्या सामानातू २ किलो ८२० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले.

या दोघींनी अंडरगारमेंट्स, कपडे, टूथपेस्ट, कॉस्मेटिक ट्यूब, साबण, पादत्राणे, मेकअप किट यांसारख्या वस्तूंमध्ये ड्रग्ज लपून ठेवले होते. एनसीबीने ६ ऑक्टोबर रोजी पुण्यातील शिरूर आणि आंबेगाव तालुक्यात तिसरी कारवाई अल्प्राझोलम या नशेच्या गोळ्या तयार करणाऱ्या कारखाना आणि प्रयोगशाळा या ठिकाणी छापे टाकून जवळपास २०० किलोच्या नशेच्या गोळ्या तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि अल्प्राझोलम गोळ्या जप्त केल्या आहे. या प्रकरणी ६ जणांना अटकण्यात आली आहे. एनसीबी जप्त केलेल्या अमली पदार्थचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १२५ कोटी एवढी किंमत असल्याची माहिती एनसीबीचे (NCB Raid) अधिकारी यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.