Mumbai Metro : आता गरबा खेळा अगदी निश्चिंत; नवरात्रीमध्ये मुंबई मेट्रोने दिली ‘ही’ सुविधा

23
Mumbai Metro : आता गरबा खेळा अगदी निश्चिंत; नवरात्रीमध्ये मुंबई मेट्रोने दिली 'ही' सुविधा

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा असलेला नवरात्रोत्सव हा सण उद्यापासून म्हणजेच रविवार १५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर (Mumbai Metro) मेट्रो मार्गिका २ ए आणि मेट्रो मार्गिका क्रमांक ७ या दोन्ही मेट्रो सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात अशी मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे.

प्रशासनाकडून नवरात्रोत्सव काळात (Mumbai Metro) मेट्रो सेवा रात्री १२.२० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्वांना निश्चिंत होऊन गरबा खेळता येणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करतांना आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारचे आभार मानले आहेत. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे लोकसेवेबाबत किती संवेदनशील आहे, याचा प्रत्यय पुन्हा यानिमित्ताने आला असून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देत असल्याचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले. (Mumbai Metro)

(हेही वाचा – Ind vs Pak : भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर का होतोय #BoycottIndoPak हा ट्रेंड?)

रविवार दि. १५ ते मंगळवार दि. २४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र तयारीला वेग आला आहे. या उत्सवात ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असतात. रात्री उशिरापर्यंत हे कार्यक्रम सुरु असतात. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी (Mumbai Metro) मेट्रो मार्गिका २ ए म्हणजे अंधेरी पश्चिम ते दहिसर आणि मार्गिका क्रमांक ७ म्हणजे दहिसर पूर्व ते गुंदवली अशी सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. (Mumbai Metro)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.