Nashik Satpir Dargah : नाशिक काठे गल्लीतील कट्टरपंथींचा पोलिसांवरील हल्ला पूर्वनियोजित ; पोलिसांचे शिक्कामोर्तब ! राजकीय कनेक्शन उघड

164
Nashik Satpir Dargah : नाशिक काठे गल्लीतील कट्टरपंथींचा पोलिसांवरील हल्ला पूर्वनियोजित ; पोलिसांचे शिक्कामोर्तब ! राजकीय कनेक्शन उघड
Nashik Satpir Dargah : नाशिक काठे गल्लीतील कट्टरपंथींचा पोलिसांवरील हल्ला पूर्वनियोजित ; पोलिसांचे शिक्कामोर्तब ! राजकीय कनेक्शन उघड

नाशिकच्या (Nashik Satpir Dargah) काठे गल्ली परिसरात मंगळवारी रात्री उशिरा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. ४०० हून अधिक कट्टरपंथींच्या जमावाने रात्री उशिरा रस्त्यावर उतरून दगडफेक केली आहे. या हल्ल्यात तब्बल 20 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे जखमींमध्ये उच्च पदस्थ दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. (Nashik Satpir Dargah)

कट रचून हल्ला
हल्ला करण्यापूर्वी पखाल रोड व उस्मानिया कॉर्नर येथे बुधवार, दि. १६ एप्रिल रोजी पहाटे दोन हजारांहून अधिक कट्टरपंथींनी पोलिसांवर कट रचून हल्ला चढविल्याचे समोर आले आहे. हा पूर्वनियोजित हल्ला असल्याचे समोर आले असून नाशिक, मालेगाव, धुळे येथील ७५ पेक्षा जास्त दुचाकी वाहने परिसरात आढळल्याने पोलिसांनी आता मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू केला आहे. सध्या परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात असून व्यवहार व वाहतूक पूर्ववत होत आहेत. तसेच ३७ -३८ जणांना अटक झाली असून इतरांचा शोधही सुरू आहे. (Nashik Satpir Dargah)

राजकीय कनेक्शन ?
याप्रकरणी राजकीय कनेक्शन असल्याचे समारे आले आहे. या प्रकरणात संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनिफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अरीफ हाजी पटेल शेखचा यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. तर गुरुवार (दि.17) रोजी काल रात्री 8 जणांना अटक करण्यात आली आहे. (Nashik Satpir Dargah)

दीड हजार लोकांविरोधात गुन्हा दाखल
समांतर तपासादरम्यान अरीफ हाजी पटेल-शेख, फईम शेख, हनिफ बशीर आणि दाऊद शेख या संशयितांनी कट रचून दंगल घडविल्याचे समोर आले. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या चौघांनी सोशल मीडियावरून भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता आणि अखंडत्व धोक्यात आणण्याच्या उद्देशाने चिथावणी दिली. तसेच जमाव गोळा झाल्यानंतर पोलिसांविषयी अफवा पसरवून पोलिसांची प्रतिमा मलीन करीत जमावास दगडफेक करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार या चौघांसह इतर सुमारे दीड हजार लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Nashik Satpir Dargah)

राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश
या प्रकरणात पोलिसांनी जमावाविरोधात खुनाचा प्रयत्न, चिथावणी देणे, मारहाण, शासकीय कामात अडथळा आणणे, दंगल घडवणे अशा एकूण ४२ विविध कलमांअंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. प्राथमिक तपासात संशयितांमध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला असून, यापूर्वी घडलेल्या दंगलीत या व्यक्तींचा सहभाग होता का, याचीही चौकशी सुरू आहे. (Nashik Satpir Dargah)

परिसरात बंदोबस्त कायम
पोलिस बंदोबस्तात अतिक्रमित बांधकाम काढल्यानंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून परिसरात बंदोबस्त कायम ठेवला आहे. दर्गा ज्या ठिकाणी होता तेथे सर्वसामान्यांना जाण्यास प्रतिबंध आहे. तसेच परिसराला तटबंदी असल्याने वाहतूक इतर मार्गांनी वळवली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना परिसरातून जाताना पोलिसांची परवानगी घ्यावी लागत आहे. (Nashik Satpir Dargah)

  • कट्टरपंथी जमावाकडून वीजपुरवठा खंडित
  • आनंद लॉन्ड्रीजवळील इमारती व गच्चीवरून दगडफेक
  • पोलिसांवर फेकले दगड व काचेच्या बाटल्या
  • हल्लेखोरांकडे मोठ्या प्रमाणात दगडांचा साठा
  • कारवाईविरोधात घोषणाबाजी आणि शिवीगाळ
  • नाशिकसह मालेगाव, धुळे येथील ७५ पेक्षा जास्त दुचाकी
  • मुख्य सूत्रधारांचा पोलिसांकडून शोध सुरू
  • १२ पोलिसांना डिस्चार्ज, पाच जणांवर उपचार सुरू

हेही वाचा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.