उत्तर प्रदेशातील मंदिरात नमाज पठण करणाऱ्याला अटक

138
उत्तर प्रदेशातील मंदिरात नमाज पठण करणाऱ्याला अटक
उत्तर प्रदेशातील मंदिरात नमाज पठण करणाऱ्याला अटक

उत्तर प्रदेशच्या हापूड येथील चंडी मंदिरात नमाज पठण करणाऱ्या मुस्लीम इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. मंदिरात नमाज पठणाच्या अनपेक्षित घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या इसमाला अटक केली असून त्याचे नाव मोहम्मद अक्रम असे आहे.

हापूड येथील चंडी माता मंदिरात मोहम्मद अक्रम नामक मुस्लीम इसमाने नमाज पठण केल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर नागरिकांनी यासंदर्भात पोलिसांना कळवले असता पोलिसांनी या इसमाला ताब्यात घेतले. दोन धर्मात तेढ निर्माण केल्याचे कृत्य करणाऱ्या अक्रमने पोलिसांना सांगितले की, आपल्यासाठी मंदिर आणि मशिद समान असल्यामुळे आज मंदिरात जाऊन नमाज पठण करावे असे आपल्या मनात आले. त्यामुळे हे कृत्य केल्याची सबब अक्रमने सांगितली.

(हेही वाचा – Mira Road Murder : माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर : लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये केले बारिक)

दरम्यान अक्रमने केलेले कृत्य अयोग्य असून इतरांच्या धार्मिक स्थळावर जाऊन नमाज पठन करणे योग्य नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. पोलीस आरोपी अक्रमची चौकशी करीत असून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.