Mumbai Police Seized Drugs : मुंबईत कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्स सह ११ जणांना अटक

जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यावरून शहानूर याचे अंडरवर्ल्डशी सबंध असण्याची शक्यता

115
Mumbai Police Seized Drugs : मुंबईत कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्स सह ११ जणांना अटक
Mumbai Police Seized Drugs : मुंबईत कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्स सह ११ जणांना अटक

मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि डोंगरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी एका महिलेसह ११ जणांना अटक केली असून अमली पदार्थासह जवळपास पावणे दोन कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही कारवाया मागील २४ तासात मुलुंड, कुर्ला, डोंगरी आणि मिरा रोड परिसरात करण्यात आल्या आहेत.

डोंगरी पोलिसांनी डोंगरीतील चिंचबंदर क्रॉस लेन, आश्रफी मंजिल परिसरातून शहानुर पटेल (वय ३२) याला अर्धा किलो एमडी आणि ८० ग्रॅम चरससह अटक करण्यात आली. पोलिसानी शहानूर याच्या घरातून अमली पदार्थांसह १ गावठी कट्टा, १ एअरगन, ४ जिवंत काडतुसे, १२ पॅकेट चर्रे, १ तलवार, १ चाकू, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, १ मॅकबुक, ३ सॅमसंग कंपनीचे टॅब, २६ मोबाईल फोन, १ लॅपटॉप आणि साडेतीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दरम्यान शहानूरच्या चौकशीत त्याने हा अमली पदार्थ मिरा रोडमध्ये राहणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाकडून विक्रीकरीता घेतला होता, अशी माहिती समोर आल्यानंतर डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाने मिरा रोड येथील चिनोय मेंशन या ठिकाणी छापा टाकून चिनॉनसी नामडी (वय ३२) या नायजेरियन व्यक्तीकडून २०० ग्राम एमडी आणि १५ ग्राम कोकेन असा एकूण १३ लाख २० हजार रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला असल्याची माहिती परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अटक करण्यात आलेल्या दोघांवर यापूर्वीचे अमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल असून शहानूर हा ६ महिन्यापूर्वीच तुरुंगातून बाहेर आला असल्याची माहिती डॉ. मुंढे यांनी दिली.

(हेही वाचा – Mumbai Police Seized Drugs : मुंबईत कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्स सह ११ जणांना अटक)

शहानूर याच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यावरून शहानूर याचे अंडरवर्ल्डशी सबंध असण्याची शक्यता वर्तवली जात असून त्या अनुषंगाने आम्ही तपास करीत असल्याची माहिती डोंगरी पोलीस ठाण्याचे वपोनि.राजन राणे यांनी दिली. तसेच मीरा रोड येथून अटक करण्यात आलेला नायजेरियन हा २०१७ मध्ये भारतात स्वतःवर मुंबईतील रुग्णालयात डोक्यावर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आला होता, त्यानंतर त्याने ड्रगच्या व्यवसयात उडी घेऊन ड्रग्स तस्करीचा व्यवसाय करू लागला असल्याची माहिती राणे यांनी दिली.

गुन्हे शाखा कक्ष ६ची कारवाई
दरम्यान गुन्हे शाखा कक्ष ६ च्या पथकाने मुलुंड पूर्व टोल नाका या ठिकाणी सापळा रचून दोन चारचाकी वाहनातुन साहिल रमजान अली खान उर्फ मस्सा (वय २७) मोहमद अजमल कासम शेख (वय ४५) शमसुद्दीन नियाजउद्दीन शहा (वय २२) इमरान अस्लम पठाण (वय ३७), मोहमद तौसिफ शौकत अली मन्सुरी (वय २७), मोहमद इस्माईल सलिम सिध्दीकी (वय २४), सर्फराज शाबीरअली खान उर्फ गोल्डन (वय ३६) सना शाबीर अली खान उर्फ प्रियंका अशोक कारकौर (वय २४) यांना अटक करून त्याच्या जवळून ७१ लाख रुपयांचा एमडी आणि कोकेन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या 8 जणांच्या चौकशीत कुर्ला पाईप रोड येथे राहणारा रईस अमीन कुरेशी याचे नाव समोर आले असता कक्ष ६च्या पथकाने कुर्ला येथे छापा टाकून रईस याला अटक करून त्याच्या घरातून एमडी हा अमली पदार्थ आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. मुलुंड आणि कुर्ला येथून अटक करण्यात आलेल्या ९ जणांकडून पोलिसांनी पोलिसांनी जप्त केलेले अमली पदार्थ आणि इतर साहित्य असा एकूण १ कोटी १९ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी विरुद्ध मुंबईसह ठाण्यात १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.