Mumbai Police : मुंबई पोलिसांची १२५ अनधिकृत पान टपरींवर धडक कारवाई

अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एकूण २७ गुन्हे दाखल करण्यात आले.

141

२५ एप्रिल रोजी अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आरोपीच्या विरोधात कारवाई करण्याकरिता पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम राबवण्यात आली. मोहिमेअंतर्गत एनडीपीएस गुन्ह्यातील अभिलखावरील एकुण ४४० आरोपी तपासण्यात आले, त्यापैकी ६७ आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. पान टपऱ्यांवर अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्या, त्यानुसार महापालिकेला सोबत घेऊन पान टपऱ्यांवर मुंबई पोलिसांनी Mumbai Police कारवाई केली.

तसेच अंमली पदार्थ Drugs बाळगल्याप्रकरणी एकूण २७ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी ४ गुन्हे एम.डी. MD व २२ गुन्हे आणि ०१ गुन्हा कोकेन cocaine बाळगल्याप्रकरणी दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांतर्गत ९,४०९ ग्रॅम गांजा, ३० ग्रॅम चरस, १९ ग्रॅम एमडी आणि कोकेनच्या ०५ बॉटल्स असे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे ७६४ सिगारेट व अन्य तंबाखुजन्य पाकीटे जप्त करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने एकूण १२५ अनधिकृत पान टपरींचे निष्कासन करण्यात आले. मुंबई पोलिसांची Mumbai Police ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली. ही कारवाई पुढेही सुरूच राहणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

(हेही वाचा Cordelia Cruise Drugs Case : आर्यन खानला मोठा दिलासा!) 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.