Mumbai Crime : एका अनोळखी पत्राने उलगडला १८ महिन्यांच्या मुलीच्या खुनाचा गुन्हा

208
Mulund Crime : डान्सबारची खबर दिल्याच्या संशयावरून बार मालकाकडून एकाला बेदम मारहाण 
Mulund Crime : डान्सबारची खबर दिल्याच्या संशयावरून बार मालकाकडून एकाला बेदम मारहाण 
मुंब्रा पोलिसांना एक पत्र प्राप्त झाले होते, या पत्रासोबत एका लहान मुलीचा फोटो देण्यात आला होता, या पत्रात या मुलीची हत्या करून मृतदेह दफन करण्यात आला असल्याचे कळविण्यात आले होते. ४ एप्रिल २०२४ आलेल्या या अनोळखी  पत्राच्या धक्कादायक मजकुराने पोलीस ठाण्यात खळबळ उडवून दिली होती. अखेर या अनोळखी पत्रासोबत आलेल्या छायाचित्र व त्यातील मुलीच्या नावावरून मुंब्र्यातील कब्रस्तान, स्थानिक खाजगी रुग्णालयात शोध घेऊन मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) या दीड वर्षाच्या मुलीच्या खुनाचा उघडकीस आणून आई वडिलांना या खुन प्रकरणात अटक केली.परंतू मुलीचा खून कशासाठी केला याबाबत अटक करण्यात आलेल्या आई वडिलांनी अद्याप देखील तोंड उघडले नसले तरी अंधश्रद्धेतुन हा प्रकार घडला का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. (Mumbai Crime)
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा हे मुस्लिमबहुल वस्ती असलेले शहर आहे. या शहरात मोठ्या प्रमाणात दाटीवाटीने येथील नागरिक राहण्यास आहे,शहराच्या मधोमध असलेल्या मुंब्रा पोलीस (Mumbra Police) ठाण्याला ४ एप्रिल २०२४ रोजी एक अर्ज प्राप्त झाला होता, या अर्जासोबत एका लहान मुलीचे छायाचित्र आणि छायाचित्रामागे मुलीचे नाव ‘लबीबा’ (Labiba) असे लिहण्यात आले होते, तसेच अर्जात असलेल्या मजकुरात या मुली सोबत अघोरी घटना घडली आहे,तीचा मृतदेह कब्रस्तान मध्ये दफन करण्यात आला असल्याचे अर्जात म्हटले होते. अनेक वेळा पोलिसांना येणारे अर्ज हे कोणा विरुद्ध तक्रारींचे किंवा बेकायदेशीर धंद्याविरुद्धचे असतात. परंतु हा अर्ज काहीसा वेगळा होता. मुंब्रा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजय दवणे यांनी तात्काळ या अर्जाची खातरजमा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या दालनात गुन्हा प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि पथकाला बोलविण्यात आले. (Mumbai Crime)
दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी या अर्जात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल करण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल क्रमांक संपर्क होत नव्हता,तसेच अर्जदाराने खोटे नाव आणि खोटा पत्ता दिल्यामुळे हा अर्ज पोलीस ठाण्यात देणाऱ्या व्यक्तीला शोधणे अवघड झाले होते.वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पोलीस अधिकारी आणि पथकाला तात्काळ मुंब्रा मधील खाजगी रुग्णालय आणि कब्रस्तान शोधण्याचे आदेश दिले. गुन्हा प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी मुलीच्या छायाचित्रांच्या आणखी काही प्रत काढून मुंब्रा येथील कौसा जामा मस्जिद ट्रस्ट व सुन्नी कब्रस्तान तसेच ठाणे महानगर पालिकेचे (Thane Municipal Corporation) नया कब्रस्तान येथे छायाचित्रातील मुलीचे दफन करण्यात आले का याचा शोध घेतला आणि पोलिसांच्या या शोध मोहिमेला नया कब्रस्तान येथे यश आले. (Mumbai Crime)
१८ मार्च २०२४ रोजी लबिबा जाहिद शेख (१८ महिने) हिचे दफन करण्यात आले असल्याची माहिती आणि ती राहत असलेल्या ठिकाणचा पत्ता पोलिसांच्या हाती लागला,तसेच ज्या डॉक्टरने मृत्यूचे प्रमाणपत्र दिले होते, त्याचे नाव देखील पोलिसांना कळले होते. पोलीस पथकाने या खाजगी रुग्णालयात जाऊन तेथील डॉक्टरांकडे जाऊन चौकशी केली असता त्यांनी आदल्या दिवशी पहाटे एक इसम ४ वर्षाच्या मुलीला घेऊन रुग्णालयात आला होता, त्याने मुलीच्या डोक्याची त्वचा अचानक फाटून त्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे सांगितले, मात्र अचानक त्वचा फाटून रक्तस्त्राव होणारा असा कुठलाही आजार नसून, त्या मुलींच्या अंगावर असलेल्या व्रण संदर्भात विचारले असता तो आपल्या ४ वर्षाच्या मुलीला घेऊन निघून गेला, व पुन्हा अर्धा तासाने तो दीड वर्षाच्या मुलीला घेऊन आला व त्याने त्या मुलीबाबत तेच कारण सांगितले असता, आम्ही तिच्यावर प्राथमिक उपचार करून मोठ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले होते अशी माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. (Mumbai Crime)
पोलीस पथकाने तात्काळ लबिबा जाहिद शेख हिच्या घरी धाव घेऊन वडील जाहिद शेख आणि आई नुराणी शेख यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून, रीतसर गुन्हा दाखल करून मुंब्रा नया कब्रस्तान येथे दफन करण्यात आलेला दीड वर्षाच्या लबिबा हिचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे.रुग्णालय येथे पाठविण्यात आला. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या आई वडिलांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीत आणि डॉक्टरांनी दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळून आल्यामुळे मुलीची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. मात्र हत्या का केली याबद्दल दोघेही कुठलीही माहिती देत नसून त्यांची दुसरी ४ वर्षाची मुलगी मात्र यातुन वाचली असून तिच्यावर मुंबईतील केईएम मध्ये उपचार करण्यात आले होते अशी माहिती समोर आली आहे. (Mumbai Crime)
लबिबा या दीड वर्षाच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) खून आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आईवडीला विरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.लबिबाचा खून हा अंधश्रद्धातुन करण्यात आला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. (Mumbai Crime)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.